*कृषी पंपांना अखंडित २४ तास विज पुरवठा करण्यात यावा*
*अन्यथा विरोधात चक्काजाम आंदोलन,पिंकु बावणेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा मोर्चा विद्युत कार्यालयावर धडकला.*
*उर्जा मंत्री ना.देवेंद्र फडणवीसांना दिले निवेदन*
देसाईगंज-
तालुक्यासह शंकरपुर फिडर अंतग॔त येत असलेल्या गावांत मोठ्या प्रमाणात रब्बी धान पिकासह भाजीपाला पिकाची लागवड करण्यात आली असुन संपुर्ण पिक कृषी पंपावर अवलंबून असतांनाच १२ तासावरुन ८ तास विज पुरवठा करून लोडशेडिंग सुरु करण्यात आली आहे. पुरेशा पाण्याअभावी पिके करपण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता कुषी पंपांना अखंडित २४ तास विज पुरवठा करण्यात यावा, अन्यथा देसाईगंज विज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर चक्का जाम करण्याचा इशारा शंकरपुर फिडर अंतग॔त येत असलेल्या शेतकऱ्यांनी कंपनिचे उपविभागीय अभियंता यांचे मार्फत राज्याचे उर्जा मंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
मागील काही दिवसांपासून ऐन रब्बी धान पिकाचे रोवणे तोंडावर असताना व भाजीपाला पिक जोमात असताना १२ तास विज पुरवठा १६ तास खंडित करुन ८ तास पुरवठा करण्यात येत आहे. यामुळे जमिनीतील पाणी जमिनीतच मुरत असल्याने रोवणीसह भाजीपाला पिक प्रभावित होऊ लागले आहेत. ही गंभीर बाब लक्षात घेता व याबाबत देसाईगंज विज वितरण कंपनी अंतग॔त येत असलेल्या शंकरपुर फिडर अंतग॔त शेतकऱ्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही लोडशेडिंग सुरुच असल्याने देसाईगंज सिटीझन फोरमचे उपाध्यक्ष पिंकु बावणे यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी विज वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयाला धडक दिली.
दरम्यान आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे विरोधी पक्षात असतांना १६ तास विज पुरवठ्यासाठी धरणे आंदोलन केल्याची आठवण करून देत सत्तेत असतांना व त्यांच्याच गाव परिसरातील शेतकऱ्यांना लोडशेडिंगचा जबर फटका बसत असतांना याबाबत चकारही बोलु नये यावरही प्रश्न चिन्ह लावण्यात आले. तथापी पिक करपत असल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी लोडशेडिंग तत्काळ बंद करून २४ अखंडित वीज पुरवठ्याची मागणी लावून धरत १२ फेब्रुवारी २०२४ पर्यंत स्थिती पूर्वपदावर आणा अन्यथा १३ फेब्रुवारी रोजी उपविभागीय कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा उपविभागीय अभियंत्यांमार्फत उर्जा मंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
यावेळी काँग्रेस कार्यकर्ते रामदास मसराम, श्याम डोके, सागर वाढई, नरेंद्र गजपुरे, अशोक बनपुरकर, शैलेश वासनिक, यादोराव म्हस्के, पांडुरंग म्हस्के, भुवनेश्वर नाकाडे, आबाजी बुल्ले, कालिदास सहारे, रवींद्र बनपुरकर, हरिदास सहारे, सोपान बुल्ले, अनिल नाकाडे, गिरीधर पुस्तोडे, मुखरू कुथे आदी मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.