जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाजावंडी शाळेत महावाचन मेळावा संपन्न

172

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाजावंडी शाळेत महावाचन मेळावा संपन्न

 

एटापल्ली:-तालुक्यातील अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल शाळा जाजावंडी या शाळेत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियान अंतर्गत महावाचन मेळावा घेण्यात आला आहे.

या महावाचन मेळाव्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाजावंडी येथील 137 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन आणि शिकवणूक ही थीम ठेवून सदर उपक्रम शाळेत राबविण्यात आला होता.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील घटनेतून मिळालेली सर्वात मोठी प्रेरणा किंवा त्यांच्या जीवनातील तीन पैलू याबाबत प्रत्येक विद्यार्थ्यांकडून एक पान लेखन करून मा, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती एटापल्ली यांच्याकडे सादर करण्यात आला. या महावाचन उपक्रमात विद्यार्थी आनंदाने सहभागी झाले.

यासाठी गटशिक्षणाधिकारी श्री,कुमरे साहेब,केन्द्र प्रमुख श्री,बेडके सर व गावातील लोक व शिक्षकांच्या मार्गदर्शन लाभला आहे.