*”अब कि बार फिर मोदी सरकार” जनसामान्य नागरिकांचा आत्मविश्वास.*
*गडचिरोली शहरातील बुथ क्र.११७ व ११८ येथे गाव चलो अभियान*
*गडचिरोली:-दि.१३ फेब्रुवारी*
*केंद्र व राज्य सरकारची यशोगाथा तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे.पी. नड्डा यांच्या सूचनेनुसार गाव चलो अभियान राबविण्यात येत आहे.*
*भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे व भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम यांनी प्रवासी कार्यकर्ता म्हणून बुथ संयोजक शहर महामंत्री विवेकजी बैस यांच्या सोबत बुथ क्र.११७ व ११८ येथे गाव चलो अभियानांतर्गत घरोघरी जाऊन केंद्र व राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती दिली.*
*याप्रसंगी नागरिकांशी संवाद साधतांना नागरिकांनी मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कार्यावर विश्वास ठेवून यावेळी सुद्धा केंद्रामध्ये मा.नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात भाजपा सरकारचं! येणार असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.*
*दिवार लेखन अभियांतर्गत सौ.योगीताताई पिपरे यांनी भाजप पक्षाचा चिन्ह काढून गाव चलो अभियानाची सुरवात केली.*
*यावेळी जनार्धनजी साखरे,निताताई बैस,श्री.धुर्वे सर,उपेंद्रजी रोहनकर उपस्थित होते.*





