अंतरगाव ( टोला) येथे मंदिर जिर्णोद्धार मुर्तीं प्राणप्रतिष्ठा सोहळा
सावली:वृत्तवाणी न्यूज
अंतरगाव (टोला) येथे सार्वजनिक हनुमान मंदिराचे जिर्णोद्धार तसेच संत श्री साईबाबाबा संत श्री गजानन महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनांक 13 फेब्रुवारी पासून तर 15 फेब्रुवारी पर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे. मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारीला सायंकाळी 4 वाजता कलश यात्रेला सुरवात व रात्री 8 वाजता श्री गुरुदेव सेवा महिला मंडळ
मेहा बूज. यांचे भजन 14फेब्रुवारीला सकाळी 8 वाजता घटस्थापना,सकाळी 12:45 वाजता मंडप देवता स्थापना पूजन , 1:30 वाजता मूर्तीचा शुद्धीकरण अभिषेक जलाधिवास दुपारी 1:30 वाजता गुरुदेव सेवा मंडळ अंतरगाव यांचे भजन सायंकाळी धान्याधीवास,पुण्याअधिवास फलअधिवास शय्याधीवास, सायंकाळी 6:30 वाजता महाआरती, रात्रौ 8 ते 11 वाजेपर्यंत श्री साई स्वरांजली म्युझिकल ग्रुप नागपूर साइराम महाराज द्वारा व आकाशवाणी दूरदर्शन कलाकार सिनेकलाकार द्वारे प्रस्तुत साई भक्तीगीतांचा आरकेस्टामय कार्यक्रम दिनांक 15 फेब्रुवारीला पहाटे 5:30 वाजेपासून मूर्तींची प्रतिस्थापणा व हवन चुधरी महाराज डोंगरगाव यांचे कीर्तन व गोपालकाला व हवन आटोपताच सायंकाळी 5:30 वाजतापासून महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे.तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आव्हान कल्पनाताई अशोक संगीडवार व हनुमान मंदिर देवस्थान कमिटीने केले आहे.





