*भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते खुले व्हॅलीबॉल स्पर्धेचे उदघाटन*

73

*भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते खुले व्हॅलीबॉल स्पर्धेचे उदघाटन*

 

अहेरी:तालुक्यातील महागाव खुर्द येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते नुकतेच भव्य खुले व्हॅलीबॉल स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.

 

येथील पोचय्याजी येनके यांच्या मैदानात भव्य खुले व्हॅलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 30 हजार,द्वितीय पारितोषिक 20 हजार व तृतीय पारितोषिक 10 हजार रुपये ठेवण्यात आले असून आयोजित स्पर्धेसाठी परिसरातील व्हॅलीबॉल संघांनी मोठ्याप्रमाणात सहभाग घेतला.यावेळी भाग्यश्री ताई आत्राम यांनी आपल्या मार्गदर्शनात ग्रामीण भागातील विविध स्पर्धेमुळे उत्कृष्ट खेळाडू घडतील अशी आशा व्यक्त केल्या.

 

स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी येथील सरपंच अध्यक्ष म्हणून सरपंच रेणुका आत्राम,प्रमुख पाहुणे म्हणून नागेश करमे,पेसा अध्यक्ष तुकाराम नैताम,माजी सरपंच श्रीहरी आलाम,महागाव (खु) चे उपसरपंच उमा मडगुलवार,मधुकर आलाम,ज्ञानेश्वर तलांडे,गिरमाजी तलांडे,आयोजक समितीचे सदस्य तसेच मंडळाचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.