*खासदार अशोक नेते यांच्या शुभहस्ते सावली तालुक्यातील मौजा- निफंद्रा येथे बालाजी नगर प्रवेश द्वार चे भूमिपूजन संपन्न…..*

60

*खासदार अशोक नेते यांच्या शुभहस्ते सावली तालुक्यातील मौजा- निफंद्रा येथे बालाजी नगर प्रवेश द्वार चे भूमिपूजन संपन्न…..*

(सावली)

दि.१३ फेब्रुवारी २०२४

सावली :- तालुक्यातील मौजा- निफंद्रा येथे बालाजी नगर प्रवेशद्वारचे भूमिपूजन कार्यक्रम सोहळा आयोजित करण्यात आले होते.

 

या प्रवेशद्वार( स्वागत गेट)चे उद्घाटन खासदार अशोक नेते यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले.

 

या प्रवेशद्वार स्वागत गेट कार्यक्रम सोहळया प्रसंगी खासदार अशोक नेते यांनी बोलताना अतिथींचे स्वागत करत असताना प्रवेशद्वार गेटवरच स्वागत केले जाते. आणि ह्या स्वागत गेटचे भूमिपूजन माझ्या हस्ते होत आहे हा एक जीवनातील अनमोल आनंददायी क्षण आहे.यशवंत बोडे पाटील यांच्या वडीलाच्या आठवणीचे प्रवेशद्वार या ठिकाणी आयोजित केले.त्यांची आठवण म्हणुन सदैव हृदयात कायम ठेवावी.असा शुभ संदेश व शुभेच्छा देत या प्रसंगी गावातील समस्या व अडी अडचणी जाणून घेत आपण दिलेल्या निवेदनाचा निश्चितच विचार करुन सोडवल्या जाईल. असा विश्वास ‌देतो.असे प्रतिपादन खा.अशोक नेते या कार्यक्रमाप्रसंगी केले.

 

यावेळी प्रामुख्याने यशवंत पाटील बोडे,उपसरपंच नानाजी उंदिरवाडे, गुरूदेव सेवा मंडळ अध्यक्ष शामराव निकोडे, शाळा व्य.अध्यक्ष रवि पा.बोरकुटे, संचालक कृ.उ.बा.स.प्रमोद धाईत,मच्छिमार सोसायटी चे अध्यक्ष हरिदास आगरे, जि.प.शाळेचे मुख्याध्यापक किसन गेडाम, बुथ प्रमुख राजू धोटे, गिरिधर मारबते,आनंदराव लाडवे,गुरुदास घुबडे,गजानन पांचलवार,कुणबी समाज अध्यक्ष प्रफुल नवघडे,आशिष आखाडे, तसेच मोठ्या संख्येने गावातील नागरिक बंधू भगिनीं उपस्थित होते.