*विविध पक्षांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जोर का झटका*

118

*विविध पक्षांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जोर का झटका*

 

*भाग्यश्री ताई आत्राम यांच्या उपस्थितीत अनेक तरुणांनी घेतला राकॉ मध्ये प्रवेश*

 

सिरोंचा:सध्या अहेरी विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या संख्येने इन कमिंग सुरू असून सिरोंचा तालुक्यात पुन्हा एकदा विविध पक्षांना जोर का झटका बसला आहे.

 

विशेष म्हणजे मागील अनेक दिवसांपासून तालुक्यातील विविध पक्षातील बरेच कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश घेतला आहे.सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम सिरोंचा तालुक्याच्या दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत तालुक्यातील अनेक युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेतल्याने विविध पक्षांना जोर का झ्टका बसला आहे.भाग्यश्री ताई आत्राम यांचे रोजचे दौरे आणि विकास कामे पाहून विरोधकांचे धाबे दणाणले आहे.

 

मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे मार्गदर्शन आणि माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर यांचा नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच विविध विकास कामांचा झंझावात पाहत राकॉ मध्ये मोठ्या प्रमाणात इन कमिंग सुरू आहे.१५ फेब्रुवारी रोजी देखील बरेच तरुण मंडळींनी भाग्यश्री ताई आत्राम यांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला.ताईंनी राकॉचा दुपट्टा गळ्यात टाकत, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत केले.यावेळी सिरोंचा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.