_*जवराबोडी मेंढा येथिल प्रो कबड्डी लीग 2024 स्पर्धेत मांदेळचा संघ विजयी*_

124

_*जवराबोडी मेंढा येथिल प्रो कबड्डी लीग 2024 स्पर्धेत मांदेळचा संघ विजयी*_

 

_*बक्षीस वितरण समारंभाला माजी जि. प. सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांची विशेष उपस्थिती*_

 

_ब्रम्हपुरी/प्रतिनिधी_

_तालुक्यातील जवराबोडी मेंढा येथे जय बजरंग बली युवा क्रीडा मंडळ, जवराबोडी मेंढा यांच्या सौजन्याने कबड्डी प्रेमिंसाठी भव्य डे नाईट कबड्डी स्पर्धा “प्रो कबड्डी लीग 2024” चे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवस चाललेल्या या भव्य कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद लाखांदूर तालुक्यातील मांदेळ गावातील संघाने मिळविले आहे. तर जवराबोडी मेंढाच्या संघाला व्दितीय क्रमांकावर समाधान मानावं लागले. तृतीय क्रमांक गवराळा येथील संघाने मिळविले आहे. स्पर्धेचे तीन ही बक्षीस महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या वतीने देण्यात आले आहेत._

_*सदर स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला माजी जि. प. सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.* तर प्रमुख पाहुणे म्हणून विवेकानंद थेरकर उपसरपंच जवराबोडी मेंढा, चरणजी थेरकर अध्यक्ष तंटा मुक्ती समिती, वामन निकुरे, प्रशांत निकुरे, दिवाकर निकुरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते._

_या स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी प्रमोदभाऊ चिमूरकर म्हणाले की, कबड्डी हा ग्रामीण भागातील खेळ आहे. तरुणांची खेळाप्रती रुची वाढवणे आणि त्यांना अधिक प्रतिभावान बनविण्यासाठी अश्या स्पर्धांचा खूप मोठा वाटा असतो. कबड्डी स्पर्धेमुळे तरुणांमध्ये जो उत्साह, जिद्द आहे. ती अशीच कायम असली पाहिजेत. अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली._

_स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जय बजरंग बली युवा क्रीडा मंडळ, जवराबोडी मेंढाचे सदस्य प्रशांत निकुरे, साक्षात नन्नावरे, अमर उईके, स्वप्नील मसराम, नवनाथ उईके, साहिल नन्नावरे, प्रवीण थेरकर, मच्छिंद्र नन्नावरे, रवी राणे, प्रफुल नन्नावरे, क्रिष्णा राणे, मयुर राणे, संदीप निकुरे, निखिल राणे, गणेश थेरकर, गणेश नन्नावरे, रोहीत नन्नावरे, संदीप राणे व अन्य सदस्यांनी मेहनत घेतली._