शिवजयंती निमित्य भव्य चित्रकला स्पर्धा १९ फेब्रुवारी २४
वेळ-सकाळी ९ ते ११ वाजता
गडचिरोली,प्रतिनिधी :-
जिल्हा परिषद (मा.शा.) हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय,गडचिरोलीच्या अमृत महोत्सवी वर्ष निमित्याने शालेय विद्यार्थाकरिता शिवजयंती निमित्य भव्य चित्रकला स्पर्धा १९ फेब्रुवारी २४ ला आयोजित केली आहे. या स्पर्धेत गडचिरोली शहरातील सर्व शाळा सहभागी होणार आहे.
नुकताच या शाळेचा भव्य दिव्य अमृत महोत्सव माजी विद्यार्थी यांच्या गव्हर्नमेंट(जि.प.) हायस्कूल अमृत महोत्सव समिती,गडचिरोली च्या वतीने पार पडला.
शिवजयंती निमित्य भव्य चित्रकला स्पर्धा दिनांक १९ फेब्रुवारी २४ ला सकाळी ९ ते ११ वाजता जिल्हा परिषद (मा.शा.) हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय,गडचिरोली येथे होणार आहे. चित्रकला स्पर्धेचा विषय 1) छत्रपती शिवाजी महाराज 2) निसर्ग चित्र 3) किल्ल्याचे चित्र आहे. यात दोन विभागात हि स्पर्धा नि:शुल्क होणार आहे. यात रोख पारितोषिक सहभागी विद्यार्थांना प्रमाणपत्र व ड्राईन्ग शिट देण्यात येणार आहे.
गट अ :- वर्ग ३ ते ५ वी १) प्रथम बक्षीस रोख १५००/- स्मृती चिन्ह,कै. अब्दुलभाई जमालभाई कडीवाल
२)द्वितीय बक्षीस रोख १०००/- स्मृतीचिन्ह,कै.मधुकरराव न्यालेवार ३)तृतीय बक्षीस रोख ५००/- स्मृती चिन्ह
कै.कन्हूभाई वल्लभभाई पटेल स्मृती प्रित्यर्थ आणि प्रोत्साहन पार बक्षीस गट ब :- वर्ग ६ ते ८ वी १) प्रथम बक्षीस रोख १५००/- स्मृती चिन्ह,कै. देवराव नगराळे सर २)द्वितीय बक्षीस रोख १०००/- स्मृतीचिन्ह कै.पी. एम. मेश्राम,सर ३)तृतीय बक्षीस रोख ५००/- स्मृती चिन्ह श्री शिवकान्त शामराव पवार,प्रोत्साहन – कै.अमीन अब्दुल भाई कडीवाल स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणार आहे.
या स्पर्धेत सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी भाग घ्यावे असे आवाहन गव्हर्नमेंट(जि.प.) हायस्कूल अमृत महोत्सव समिती,गडचिरोली आयोजक उदय धकाते,निमेश पटेल,राजेश निखारे,समीर कडीवाल,निलेश दंडवते, कु.शोभा देवराव नगराळे, नितीन भडांगे,उल्हास बाटवे,सतीश पवार,उमेश रोटकर,प्रा.धर्मेंद्र मूनघाटे,सुरेखा घुमारे,राणी कुंभारे आदींनी केले आहे.