*गाव चलो अभियान गडचिरोली शहरात यशस्वी करा*
*भाजपा विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर यांचे आवाहन*
*भाजपा विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर यांच्या उपस्थितीत गडचिरोली शहरात गाव चलो अभियानाचा शुभारंभ*
*गानली सभागृहातून शहरातील सर्व ४३ बुथावर अभियानाचा शुभारंभ*
*दिनांक १५ फेब्रुवारी २०२४ गडचिरोली*
*मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात देश जागतिक नेतृत्वाकडे चालला असून त्यांनी देशाच्या विकासासाठी केलेले कार्य प्रत्येक माणसापर्यंत पोहोचले पाहिजे त्याकरीता गाव चलो अभियान असून मोदीजींनी केलेल्या कार्याची माहिती सर्वांना द्यावी व गडचिरोली शहरात गाव चलो अभियान यशस्वी करावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे विदर्भ संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्रजी कोठेकर यांनी गडचिरोली शहरातील गाव चलो अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी केली.*
*भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराच्या गाव चलो अभियानाचा शुभारंभ आरमोरी रोडवरील गानली सभागृहात भारतीय जनता पार्टीचे विदर्भ संघटन मंत्री डॉ.उपेंद्रजी कोठेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी मंचावर खासदार अशोकजी नेते, आमदार डॉक्टर देवरावजी होळी भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रशांतजी वाघरे , भाजपाचे प्रदेश पदाधिकारी अरुणजी लाखानी, लोकसभा विस्तारक बाबुरावजी कोहळे, लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा,जिल्हा महामंत्री सौ.योगीताताई पिपरे,जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,अभियानाचे जिल्हा संयोजक रमेशजी भूरसे, शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे प्रामुख्याने उपस्थित होते.*
*आरमोरी रोडवरील गानली सभागृह येथे सकाळी १० वाजता गडचिरोली शहरातील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी, शहरातील ४३ बूथ प्रमुख व ४३ प्रवासी कार्यकर्त्यांची बैठक संघटन मंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.*
*गडचिरोली शहरात दुपारी १२ ते ५ वाजता पर्यंत प्रवासी कार्यकर्ते व बुथ प्रमुख गाव चलो अभियान राबविण्यासाठी प्रत्येक बुथावर पाठवण्यात आले.यामध्ये मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या १० वर्षातील जनकल्याणकारी योजनांची माहिती असलेले पत्रक घराघरांमध्ये पोहचविणे,सर्व बुथ समित्यांची आणि पन्ना प्रमुखाची नियुक्ती करणे,व्हाट्सएप ग्रुप तयार करणे,बुथाची पूर्ण रचना तयार करणे. यावर कार्य केले.*
*सायंकाळी ७ वाजता विदर्भ संघटन मंत्री मा. डॉ. उपेंद्रजी कोठेकर यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली.यावेळी ४३ बुथावरील बुथ प्रवासी कार्यकर्ता व बुथ प्रमुख यांनी केलेल्या गाव चलो अभियान कार्याची प्रशंसा केली. व उर्वरित कार्य २० फेब्रुवारी पर्यंत पुर्ण करावे अशी सूचना देली.*
*डॉ. उपेंद्रजी कोठेकर यांनीही शहरातील ३ बुथावर स्वतः गाव चलो अभियानात सहभागी होऊन ,बुथ बैठकीमध्ये उपस्थित होते.*