_*खरबी येथिल ग्रामीण क्रिकेट स्पर्धेत मेंढाचा संघ विजयी*_

113

_*खरबी येथिल ग्रामीण क्रिकेट स्पर्धेत मेंढाचा संघ विजयी*_

 

_*बक्षीस वितरण समारंभाला माजी जि. प. सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांची विशेष उपस्थिती*_

 

_ब्रम्हपुरी/प्रतिनिधी_

_तालुक्यातील खरबी येथे राम भरोसे क्रिकेट क्लब खरबी/खेड मक्ता यांच्या सौजन्याने क्रिकेटप्रेमिंसाठी भव्य रात्रकालीन अंडर आर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भव्य रात्रकालीन अंडर आर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद नागभिड तालुक्यातील मेंढा (की.) गावातील ऑरेंज क्रिकेट क्लब संघाने मिळविले आहे. तर किरमिटी येथील श्री साई क्रिकेट क्लब संघाला व्दितीय क्रमांकावर समाधान मानावं लागले. तृतीय क्रमांक मालडोंगरी येथील यारी दोस्ती क्रिकेट क्लब संघाने मिळविले आहे. क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघास विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार व माजी नगरसेवक नितीन उराडे यांच्याकडून 31 हजार रोख आहे. द्वितीय पारितोषिक माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्याकडून 21 हजार रुपये रोख, तृतीय पारितोषिक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश वारजुकर यांच्याकडून 11 हजार रुपये रोख देण्यात_

_*सदर स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला माजी जि. प. सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.* तर प्रमुख पाहुणे म्हणून धनराज शिवणकर, कमलेश मुळे, वकार खान सचिव श.काँ.क. ब्रम्हपुरी, सुनिताताई सावजकर ग्रा. पं. सदस्या, प्रितीताई धोंगडे पो.पा. खरबी, मुरली सावजकर, लोकेश सेलोकर, दिनेश लाडे, भोजराज बारसागडे, रेखाताई लाडे अंगणवाडी सेविका, हरीश सोरते व अन्य मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते._

_या स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी प्रमोदभाऊ चिमूरकर म्हणाले की, क्रिकेट हा असा खेळ आहे ज्याचे अनेक फायदे आहेत. हा खेळ आहे जो खेळाडूंना कसे लढावे हे शिकवतो आणि नेतृत्वगुण विकसित करण्यास मदत करतो. ग्रामीण भागातही खूप प्रतिभावान खेळाडू आहेत, त्यांना फक्त योग्य मार्गदर्शनाची आणि व्यासपीठावर घेऊन जाण्याची गरज आहे. खरबी/खेड गावात ही स्पर्धा आयोजित केली आहे, ज्यामुळे खेळाडूंना त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्याची संधी मिळाली. असे मत त्यांनी व्यक्त केले._

_स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी राम भरोसे क्रिकेट क्लब खरबी/खेड मक्ताच्या सदस्यांनी मेहनत घेतली._