खाऊ हा शब्द मुळात लहान मुलांच्या आवडीचा, आपल्याला जसे खाऊ आवडतो तसे प्राण्यांसाठी खाऊ म्हणून देण्यासाठी संस्कार पब्लिक स्कूल एटापल्ली च्या विद्यार्थ्यांनी विजय संस्कार यांच्या मार्गदर्शनाखाली एक अभिनव उपक्रम सुरू केलेला आहे. शाळेत आणलेल्या टिफिन मध्ये उरलेले अन्न फेकण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी प्राण्यांसाठी तो गोळा करून शाळेच्या एका विशिष्ट ठिकाणी सर्वभूत हिते रत: या भावनेने जमा करून त्यासोबत पाण्याची व्यवस्था विध्यार्थ्यांनी केलेली आहे. त्यामुळे विध्यार्थ्यांमध्ये भूतदया म्हणजे प्राणी मात्रांवर दया विकसित होत आहे. आपले अन्न शेतातून पिकून आपल्या ताटात येईपर्यंतच्या प्रवासाबद्दल विद्यार्थ्यांनी जाणून घेतले त्यामुळे आपोआपच विध्यार्थी अन्न या बाबत गांभीर्याने विचार करू लागलेले आहे. या बरोबरच प्राणी, त्यांचा अधिवास, पाणी आणि अन्न खाण्याच्या पद्धती इत्यादींचा अभ्यास विध्यार्थी सहज करू शकत आहेत. आपल्या पाल्यांनी अन्न वाया न घालवता प्राण्यांना दिले याबाबत पालकही समाधानी आहेत. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.