विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेऊन एटापल्ली येथील संस्कार पब्लिक स्कूल शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवाजी महाराजांचे जन्मापासून सर्व मुख्य घटनापर्यन्त विद्यार्थ्यांनी चित्र प्रदर्शनी स्वतः तयार करून शाळेत सर्व विद्यार्थ्यांसमक्ष सादरीकरण केले.शाळेच्या विद्यार्थ्यांच्या बालसंसद मंत्रिमंडळाने शिवरायांची वेशभूषा घेऊन साक्षात त्यांच्या समक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र दर्शन प्रस्तुत केले. याबरोबरच त्यांनी शिवगर्जना स्पर्धा आयोजित केलेली होती. यात विध्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. शाळेत उपस्थित पालक वर्गाने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत माननिय मुख्यमंत्री यांचे संदेशपत्र यासोबत सेल्फी या उपक्रमात भाग घेतला. यावेळी शाळेचे संस्थापक श्री विजय संस्कार व संस्थेचे सदस्य सौ पूजा संस्कार व मुख्याध्यापक अमोल गजाडीवार यांनी विध्यार्थ्यांना छत्रपती शिवरायांचे आदर्श जीवनाविषयी विषयार्थ्यांना मार्गदर्शन केले. विध्यार्थ्यांनी रॅली काढून छत्रपती शिवाजी चौकात शिवगर्जना घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Home Breaking News विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेऊन एटापल्ली येथील संस्कार पब्लिक...