*शिवाजी महाराजांचे विचार व जिद्द चिकाटी प्रेरणादायी:-सौ.योगीताताई पिपरे*

85

*शिवाजी महाराजांचे विचार व जिद्द चिकाटी प्रेरणादायी:-सौ.योगीताताई पिपरे*

 

*भाजपा महिला आघाडी गडचिरोली शहराच्या वतीने छत्रपती शिवाज महाराज यांची जयंती साजरी.*

 

*गडचिरोली:-दि.१९ फेब्रुवारी*

 

*संपुर्ण जगात शिवरायांचे तेज असुन ते दुरदर्शी नेते,निर्भीड योद्धे,संस्कृतीचे रक्षक आणि सुशासणाचे मूर्त रुप आहेत.त्यांचे जीवन अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे.त्यामुळे प्रत्येकाने शिवाजी महाराजांचे विचार व जिद्द चिकाटी आत्मसात करावे असे प्रतिपादन भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांनी केले.*

*भारतीय जनता पार्टी महिला आघाडी गडचिरोली शहराच्या वतीने स्थानिक इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृह येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकतांना त्या बोलत होत्या.*

*तत्पुर्वी लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे,भाजपा जिल्हा महामंत्री सौ.योगीताताई पिपरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ.गीताताई हिंगे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला दिप प्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.*

*याप्रसंगी महिला आघाडी शहर अध्यक्ष कविताताई उरकुडे,जिल्हा सचिव वर्षाताई शेडमाके,त्रिशाताई डोईजड,पल्लवीताई बारापात्रे,वैष्णवी नैताम,रश्मीताई बानमारे,पूनम हेमके,स्वाती चंदनखेडे,सिमा कन्नमवार,भारती खोब्रागडे,वैष्णवी डोंगरे तसेच भाजपा महिला आघाडी चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.*