*दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन*
गडचिरोली दि. २० : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी जिल्हा माहिती कार्यालयात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
ज्येष्ठ पत्रकार रोहिदास राऊत, मनोज ताजणे, विभागीय अधिस्विकृती समितीचे सदस्य अविनाश भांडेकर, तसेच पत्रकार सर्वश्री सुरेश नगराळे, शेमदेव चाफले, मिलींद उमरे, जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव व माहिती कार्यालयातील कर्मचारी महादेव बसेना, दिनेश वरखडे, स्वप्नील महल्ले, वामन खंडाईत, गुरूदास गेडाम यांनी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
000