*एटापल्ली नगरपंचायत मध्ये सभापती निवडणूक अविरोध*

63

*एटापल्ली नगरपंचायत मध्ये सभापती निवडणूक अविरोध*

 

*सलग तिसऱ्यांदा बांधकाम सभापती म्हणून राघवेंद्र सुल्वावार यांची निवड*

 

एटापल्ली येथील नगरपंचायतीच्या विषय समितीच्या सभापतीपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने दिनांक २० फेब्रुवारी २०२४ ला तिसऱ्यांदा सभापती निवडण्यासाठी सभा पार पडली.

त्यात सर्व सभापतींची निवड अविरोध झाली.विशेष म्हणजे सलग तिसऱ्यांदा बांधकाम सभापती म्हणून राघवेंद्र सुल्वावार यांची निवड करण्यात आली.

 

नगराध्यक्ष दिपयंती पेंदाम यांच्यासह उपनगराध्यक्ष मीनाताई नागुलवार यांच्याकडे आरोग्य व स्वच्छता समिती व तसेच नगरसेवक राघवेंद्र सुल्वावार यांच्याकडे बांधकाम सभापती तर नामदेव हिचामी यांची पाणी पुरवठा व जलनिस्सारण सभापती व तसेच महिला व बालकल्याण सभापती म्हणून जानोबाई गावडे यांची अविरोध निवड झाली.

 

सदर निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून आदित्य जिवने उपविभागीय अधिकारी एटापल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण चौधरी नायब तहसिलदार तथा मुख्याधिकारी नगरपंचायत एटापल्ली यांनी कामकाज पाहिले.