संत शिरोमणी वैराग्यमुर्ती गाडगे बाबा ह्यांची 148 वी जयंती महोत्सव संत गाडगेबाबा धोबी, वरठी, परीट सेवा मंडळ चंद्रपूर ह्यांच्या वतीने गाडगेबाबा सभागृह दादमहाल वॉर्ड चंद्रपूर येथे दिनांक 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी अत्यंत उल्हास आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली

79

संत शिरोमणी वैराग्यमुर्ती गाडगे बाबा ह्यांची 148 वी जयंती महोत्सव संत गाडगेबाबा धोबी, वरठी, परीट सेवा मंडळ चंद्रपूर ह्यांच्या वतीने गाडगेबाबा सभागृह दादमहाल वॉर्ड चंद्रपूर येथे दिनांक 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी अत्यंत उल्हास आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

22फेब्रुवारी ला रात्री विविध भजन मंडळींनी संताची भजन सादर केली.23 तारखेला

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सकाळी 9 .00 वाजता गाडगेबाबांच्या प्रतिमेचे समाज बांधवां कडून पूजन करण्यात आले.

सकाळी 11.00 वाजता ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत गाडगेबाबाची वेषभुषा हे मुख्य आकर्षण होते.

दुपारी 1.00 वाजता विविध कार्यक्रमाला सुरुवात झाली.कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील समाज बांधव बहु संख्येने उपस्थित होते. व्यासपीठावर माजी नगरसेवक नंदू नगरकर,चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष विश्वनाथ मुक्के, सौ.संगीता दुरुटकर, क्षीरसागरजी ,देवाजी बारसागडे सर्व तालुका अध्यक्ष, रवि मेश्राम ब्रह्मपुरी,भारत चूनारकर , नगभीड,तुळशीराम बारसागडे,अनिल माथनकर तलोधी, मारोती भोस्कर गुरुजी, भाऊराव तुराणकर कोरपना,राजकुमार चिंचोलकर,मनोहर वाघमारे,रमेश लोणारे राजुरा,हरिभाऊ भाजपाले ज्ञानेश्वर खारटकर वरोरा,शैलेश केळझरकर चंद्रपूर, योगीराज मिलमिले (गाडगेबाबा वेशभूषा)

विनायक काळे बल्लारपूर,भगवान लोणारे नागपूर इत्यादी उपस्थित होते.

या कार्यक्रमात श्री विश्वनाथ जी मुक्के आणि श्री नामदेवराव लोणारवार ह्यांचा राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल तर नंदिनी प्रकाश चुनारकर ह्यांचा राष्ट्रीय ग्राहक संरक्षण परिषद चंद्रपूर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. .

दहावी बारावी मध्ये विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्याचा विशेष भेट देऊन सत्कार करण्यात आला.यात साक्षी कोंडपर्तिवार,शर्वरी बारसागडे , सावरी येलमुलवार, गौरी भोस्कर,युगांशी पदमेकर,सार्थक भोजेकर ,मंथन खारटकर, श्रेया वाघमारे ,मंथन खंडाळकर ह्यांचा समावेश होता .त्याच बरोबर विविध खेळात प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या युगांशी पदमेकर कुस्ती राज्यस्तरीय कास्य पदक ,सक्षम पाकुलवार कराटे राज्यस्तरीय सुवर्ण पदक , प्रणाली गट्टीवार रस्सीखेच राज्यस्तरीय पुरस्कार, सार्थक भोजेकर,युवराज नाकाडे कबड्डी, खो खो, व्हालीबॉल शालेय स्तरीय , जानव्ही गड्डमवार कुस्ती विदर्भ स्तरीय इत्यादी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी वधुवर परिचय मेळावा घेण्यात आला. गाडगेबाबा एक चालते बोलते विद्यापीठ होते.देव दगडात नाही तर माणसात आहे. आपल्या मुलांना शिक्षण द्या .

दारू पिऊ नका .पशुची हत्या करू नका.हे कसे गाडगे बाबांनी आपल्याला कीर्तनातून सांगितले .यावर व्यासपीठावरील मान्यवरांनी गाडगेबाबांच्या जीवनावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.नंदिनी चूनारकर आणि श्री.बंडू रोहणकर ह्यांनी केले.तर प्रास्ताविक सौ.संगीता दुरुटकर ह्यांनी केले.तर आभार प्रदर्शन बंडू दुरुटकर ह्यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विश्वनाथ मुक्के,बंडू रोहणकर,बंडू दुरुटकर,रत्नाकर नल्लुरवार,अशोक तुराणकर,उद्धव नांदेकर,प्रमोद केळझरकर ,शैलेश केळझरकर सचिन गड्डमवार,मोहन गड्डमवार,सुधीर पाकुलवार,बाळू पाकुलवार,गजानन आकनुरवार,मोहन चूनारकर,देवाजी बारसागडे, धनराज येलमुलवार,अनिल रोहणकर,मिलिंद लोणारवार,दिलीप गड्डमवार ,प्रतिभा लोणारे,सुनीता पाकुलवार,अंजू लोणारे,प्रतिभा गड्डमवार,रिना बरबटकर नीलिमा रोहणकर,लता नल्लुरवार,मीनाताई मेडपल्लिवार

अथक परिश्रम केले.