Home Breaking News *अहेरी तालुका काँग्रेस कमिटीकडून अजयभाऊ कंकडालवार यांच्या शाल व श्रीफळ देऊन जाहीर...

*अहेरी तालुका काँग्रेस कमिटीकडून अजयभाऊ कंकडालवार यांच्या शाल व श्रीफळ देऊन जाहीर सत्कार*

207

*अहेरी तालुका काँग्रेस कमिटीकडून अजयभाऊ कंकडालवार यांच्या शाल व श्रीफळ देऊन जाहीर सत्कार*

 

*काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा क्षेत्र निवडणूक प्रभारी म्हणून निवडीबद्दल सत्कार*

 

अहेरी : आदिवासी विद्यार्थी संघाचे,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांची अहेरी तालुका काँग्रेस कामिटीकडून शाल व श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.

 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून राज्यातील 288 विधानसभा क्षेत्रांचे निवडणूक प्रभारी पदांचे घोषणा करण्यात आली.यात अहेरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाकडून प्रभारी म्हणून अजयभाऊ कंकडालवार यांचा नावाची घोषणा करण्यात आली.या घोषणेने गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेस पक्षात जल्लोषाचे वातावरण निर्माण झालेल्या आहे.

 

या’निवडीचे औचित्य साधून अहेरी तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अजयभाऊ कंकडालवार यांची त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात जाऊन त्यांची शाल व श्रीफळ देऊन जाहीर करण्यात आला.यावेळी उपस्थित स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Don`t copy text!