*माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम यांच्या नेतृत्वाखालील आविस,काँग्रेसला दे धक्का..!*
*एटापल्ली तालुक्यातील विविध गावातील शेकडो आविस,काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला भाजपा पक्ष प्रवेश..!!*
*एटापल्ली* :- माजी राज्यमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली एटापल्ली तालुक्यातील कसनसुर येथे भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी कसनसुर-जारावंडी क्षेत्रातील शेकडो कार्यकर्त्यांनी आविस,काँग्रेसला धक्का देत.माजी राज्यमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पक्ष प्रवेश केला.आगामी निवडणुकीच्या दृष्टीने हा आविस,काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
माजी राज्यमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम यांच्या नेतृत्वाखाली दिवसेंदिवस अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुक्यातील विविध पक्षाचे अनेक कार्यकर्ते पक्ष प्रवेश करत आहेत.राजे साहेबांचा शांत संयमी स्वभाव,त्यांची कार्यशैली,विकासात्मक दूरदृष्टी,दानशूर वृत्ती,प्रत्येक कार्या विषयी सकारात्मक दृष्टिकोन आणि आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याप्रति असलेली आपुलकी हे आज आकर्षणाच केंद्र बिंदू ठरत आहे.त्यामुळे आज अहेरी विधानसभा क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेचा वलय त्यांच्या भोवती निष्ठेने वावरताना दिसत आहे.
माजी सरपंच सुनील मडावी,आदिवासी विविध सह.संस्था कसनसुर उपसभापती बरसू उसेंडी,युवा नेते शुभम मूनराट्टीवार यांच्यासह कसनसुर,पुंनूर,वेनासार,घोटसूर,मुसरमगुद,तूंमुरगुंडा येथील आविस,काँग्रेसचे युवा कार्यकर्ते,महिला कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी शेकडोच्या संख्येने भाजपा पक्ष प्रवेश केला.!
भव्य कार्यकर्ता मेळावा कार्यक्रमाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक म्हणून माजी राज्यमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम हे होते.त्यावेळी राजे साहिबांची धुमधडाक्यात रैली काढण्यात आली.भल्यामोठ्या पुष्पहाराने त्यांचे स्वागत करण्यात आले.तर यावेळी प्रमुख अतिथी म्हणून युवा नेते कुमार अवधेशरावबाबा आत्राम,एटापल्ली भाजप तालुका अध्यक्ष प्रशांत आत्राम,तालुका महामंत्री मोहन नामेवार,सरपंच कमलताई हेडो,ग्रा.प.सदस्य छायाताई कोवासे,दामोदर नरोटे,योगेश कुमरे,रेनेद्रा येमला,देवू गावडे,संपत पैदाकुलवार,अनुप टेम्पो,आविष्कार गडमवार हे उपस्थित होते.