*नारी शक्तीवंदन पद यात्रेत महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद*
*भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने गडचिरोली शहरात नारी शक्ती वंदन पद यात्रा*
*गडचिरोली:-दि.५ फेब्रुवारी*
*”रन फार नेशन, रन फॉर मोदी” या उपक्रमाअंतर्गत भारतीय जनता पार्टी महिला आघाडी च्या वतीने भाजपा जिल्हा महामंत्री सौ.योगीताताई पिपरे यांच्या नेतृत्वात नारी शक्ती वंदन पद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.नारी शक्ती वंदन पद यात्रेला इंदिरा गांधी चौकातून प्रारंभ करून शहरातील मुख्य मार्गाने स्लोगन हातात घेऊन मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा जय घोष करीत पद यात्रा काढण्यात आली.*
*या पद यात्रेचे शुभारंभ मा. आमदार डॉ. देवरावजी होळी,जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री सौ.योगीताताई पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.*
*यावेळी प्रतिभाताई चौधरी,कविताताई उरकुडे,लक्ष्मीताई कलंत्री, पुष्पाताई करकाडे,त्रिशाताई डोईजड,रश्मीताई बानमारे, वैष्णवीताई नैताम,पल्लवीताई बारापात्रे,अर्चनाताई बोरकुटे, अर्चनाताई चनावार,अर्चनाताई निंबोळ,लताताई लाटकर,नीताताई उंदीरवाडे,अलकाताई पोहनकार, रेखाताई उईके,स्वातीताई चंदनखेडे,ज्योतीताई बागडे,पुनमताई हेमके,कोमलताई बारसागडे,नेवारेताई तसेच भाजपा महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.*