*_सेवाभावातून साजरा झाला माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांचा वाढदिवस_*
गडचिरोली | दि. १ जुलै २०२५
भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांचा वाढदिवस यंदा अत्यंत उत्साही वातावरणात, विविध सेवाभावी उपक्रमांच्या माध्यमातून, समाजाशी नाळ जुळवत आणि लोकसहभागातून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात गडचिरोली येथील आराध्यदैवत श्री. सेमाना देवस्थान येथे पूजाअर्चा व आरतीने झाली. यानंतर सेमाना गार्डन येथे “एक पेड़ माँ के नाम” या संकल्पनेतून वृक्षारोपण करण्यात आले. विवेकानंद नगरातील मातोश्री वृद्धाश्रम येथे वृद्धांसाठी अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. याचप्रमाणे मूकबधिर विद्यालय मुरखडा तसेच कौशल्य निवासी मतीमंद विद्यालय बोदली येथे शैक्षणिक साहित्य वाटपाने विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यात आले.
देशोन्नती मनस्वी मंचतर्फे डॉक्टर्स डे साजरा करण्यात आला. त्याचबरोबर महिला व बाल रुग्णालय येथे “माणुसकीचा एक ध्यास” म्हणून अन्नदान उपक्रम राबवण्यात आला. तसेच गुजरात येथील सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळा आणि रुद्र पूजा सुद्धा करण्यात आले यांचे आयोजन सुमानंद हॉल, गडचिरोली येथे करण्यात आले होते.
यावेळी गजानन गेडाम (गाव – गोविंदपूर) या व्यक्तीवर डुकराच्या हल्ल्यात झालेल्या जखमेच्या पार्श्वभूमीवर, माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. याच ठिकाणी डॉक्टर्स डे निमित्ताने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक सतिशकुमार सोलंकी यांचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आला.
दिवसभर डॉ. अशोकजी नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छांचा वर्षाव केला. वाढदिवसाचे औचित्य साधून समाजासाठी उपयुक्त उपक्रमांची साखळी उभी राहत असल्याने या दिवसाला सेवाभावाची प्रेरणा मिळाली.
या कार्यक्रमांना उपस्थित राहून सहभाग नोंदवणाऱ्या मान्यवरांमध्ये –
आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, मानवाधिकार संघटना प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणयजी खुणे,
जिल्हा महामंत्री योगिता पिपरे,
जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे,
जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी,
भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिल तिडके,महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गिताताई हिंगे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर,
जेष्ठ नेते सुधाकरजी येंगदलवार,
भाजपा तालुकाध्यक्ष दतू सुत्रपवार, शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर,विलास पा. भांडेकर,
का.आ.प्र.सचिव गोवर्धन चव्हाण,देशोन्नती जिल्हा वार्ताहर अनिल धामोडे सर,का.आ. जिल्हाध्यक्ष सुधाकरजी पेटकर,
शहर महामंत्री विनोद देवोजवार,
माजी नगरसेविका लता लाटकर,
देवाजी लाटकर,हर्षल गेडाम,
अविनाश विश्रोजवार,श्यामभाऊ वाढई, भूपेशभाऊ कुळमेथे,
प्रशांत अल्मपटलावार,श्रीकांत पतरंगे,हितेश नवघडे,गणेश दहेलकर, नरेश हजारे,विकास पायडलवार,राकेश राचमलवार, रवि मोहुर्ले तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्रपरिवार यांनी आपली उपस्थिती दर्शवली.
या सेवाभावी उपक्रमांनी डॉ. अशोकजी नेते यांचा वाढदिवस केवळ एक साजरा करण्याचा प्रसंग न राहता, समाजासाठी कृतज्ञतेने काहीतरी करण्याचा संकल्प बनून उभा राहिला.