*_जनतेचे खरे लोकनेते… डॉ. अशोकजी नेते!_*
*(वाढदिवस विशेष लेख)*
“जनसेवा हीच ईश्वरसेवा”, हे तत्व मनापासून मानणाऱ्या, सामान्यांपासून प्रवास सुरू करून लोकसभेपर्यंत पोहोचलेल्या आणि अजूनही जमिनीशी आपुलकीचे नाते जपणाऱ्या आदर्श नेतृत्वाचा चेहरा म्हणजे डॉ. अशोकजी नेते!
भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री, गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार, व दोन वेळा आमदार या नात्याने त्यांनी विदर्भ आणि विशेषतः गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम भागाला विकासाच्या दिशेने चालना दिली.
*_✦ प्रेरणादायी सुरुवात – सामान्य माणसाचा असामान्य प्रवास_*
१ जुलै १९६८ रोजी मौजा- बरडपवनी ता.नरखेड जि.नागपुर एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या अशोकजीं नेतेचं बालपण गरिबी, संघर्ष, आणि आत्मसन्मान यांच्यात गेले.त्यांचे वडील व मोठे बंधु भगवान शंकर महादेवाचे भक्त होते.त्यांच्यात भक्तीभाव होता पण कुटुंबाचा राजकारणाशी कुठलाही संबंध नव्हता. परंतु त्यांच्या मनात लहानपणापासूनच सामाजिक जाणीव आणि समाजहितासाठी काही तरी करावे ही तीव्र भावना होती.
मोठे बंधू गडचिरोली येथे आरटीओ विभागात कार्यरत असताना अशोकजी नेते त्यांच्या सोबत गडचिरोलीला आले आणि उपजिविकेचे साधन म्हणुन एका छोट्याशा खानावळीच्या माध्यमातून आपल्या सेवाभावी प्रवृत्तीची सुरुवात झाली.हळूहळू ही खानावळ केवळ उदरनिर्वाहाचे साधन नव्हती, तर गडचिरोली मध्ये अतिदुर्गम भागातुन येणारा प्रत्येक माणुस अडीअडचणी आल्यास खानावळीत येत होता त्यावेळी त्याला आस्थेने, आपुलकीने, प्रेमाने,विचारणा व्हायची व त्यांच्या अडचणी समजून घेऊन दुर केल्या जात होत्या व तिथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सन्मान, प्रेम आणि ऐकून घेण्याचे स्थान मिळत असे. इथूनच त्यांच्या जनसंपर्काचा पाया घातला गेला.
*✦ राजकारणात प्रवेश – कार्यकर्त्यांपासून विधिमंडळात*
भाजप युवा मोर्चाचा कार्यकर्ता, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारांसोबत जोडून भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष म्हणून त्यांनी राजकीय जीवनाची सुरुवात केली. निष्ठा, शिस्त आणि कार्यक्षमतेच्या जोरावर त्यांनी पक्षात लवकरच ओळख निर्माण केली.जनसंपर्काच्या माध्यमातून जनतेची मने जिंकून
१९९९ मध्ये त्यांनी पहिली विधानसभा निवडणूक लढवून जिंकली आणि प्रथमच आमदार झाले.
२००४ मध्ये पुन्हा आमदार म्हणून निवडून आले. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे, अभ्यासू व संयमी स्वभावामुळे आणि लोकहितासाठी लढण्याच्या वृत्तीमुळे त्यांची एक प्रामाणिक व विकासाभिमुख नेते म्हणून ओळख निर्माण झाली.
*_✦ संसदेत आदिवासींचा ठाम आवाज_*
२०१४ साली गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेत निवडून आले.
खासदार म्हणून १० वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी:
✅ १७०० हून अधिक वेळा संसदेत उपस्थिती
✅ २७२ प्रश्न संसदेत उपस्थित
✅ ३७७ शून्य प्रहरात मांडलेले विषय
या आकड्यांवरून त्यांच्या कार्यक्षमतेची स्पष्ट साक्ष मिळते.
त्यांच्या प्रयत्नातून गडचिरोली-चिमूर सारख्या नक्षलग्रस्त भागात रस्ते, पूल, सिंचन, मोबाईल नेटवर्क, वीज, बँका, रेल्वे, शिक्षण, आरोग्य यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण करणारी अभूतपूर्व विकासकामे घडली. विशेषतः आदिवासी, महिला, युवक आणि मागासवर्गीय समाजासाठी त्यांनी वेगवेगळ्या योजना राबवून सशक्तीकरणाचे कार्य केले.
*✦ विकासकामांची ठळक उदाहरणे*
🔹 ₹१४०० कोटींची पायाभूत विकास कामे – राष्ट्रीय महामार्ग, पूल, चिचडोह,कोटगल बँरेज सिंचन योजनांचे विस्तार
🔹 रेल्वे प्रकल्प – वडसा-गडचिरोली, गडचिरोली-चामोर्शी-आष्टी-सिरोंचा-मंचेरियल मार्ग,गडचिरोली धानोरा मुरुमगांव, भानुप्रताप छ.ग.जाणारा मार्ग, काँम्पा,टेम्पा,चिमुर,वरोरा बाँडगेज मार्ग, असे विविध रेल्वे चे जिल्हयात विस्तारासाठी जाळे,
🔹 औद्योगिक प्रकल्प – सुरजागड लोह प्रकल्प, कोनसरी स्टील प्लांट
🔹 शैक्षणिक संस्थांचे स्थापन – गोंडवाना विद्यापीठ, कृषी व वैद्यकीय महाविद्यालये, एकलव्य निवासी विद्यालय
🔹 आदिवासी युवकांसाठी योजना – स्वरोजगार, प्रशिक्षण केंद्रे, शिष्यवृत्ती योजना,हवाई पट्टा
*✦ आंतरराष्ट्रीय सन्मान – “डॉ.” पदवीने गौरव*
राजकारणापेक्षा समाजकारण हेच जीवनकार्य मानणाऱ्या डॉ. अशोकजी नेते यांच्या सामाजिक बांधिलकीला आंतरराष्ट्रीय स्तरावरही गौरव मिळाला आहे.
गोवा येथे आयोजित विशेष समारंभात, “South Western American University” (USA) या संस्थेच्या वतीने त्यांना “Doctorate in Social Service & Leadership (Honoris Causa)” ही पदवी प्रदान करण्यात आली.
हा पुरस्कार त्यांच्या सामाजिक कार्यातल्या सातत्यपूर्ण योगदानाची जागतिक पातळीवरील पोचपावती आहे.
*✦ पराभवानंतरही सेवेतच समर्पित*
राजकीय पराभव आल्यानंतर अनेक जण निवांत होतात. मात्र अशोकजी नेते यांनी पराभव हे जनसेवेचा नवा अध्याय मानले.
भामरागड, अहेरी, एटापल्ली, मुलचेरा, कुरखेडा, कोरची, धानोरा यांसारख्या अतिदुर्गम भागांमध्ये त्यांनी नियमित भेटी देत लोकांचे प्रश्न ऐकून घेणे आणि सोडवण्यासाठी प्रयत्न करणे सुरूच ठेवले.
त्यांचे जनसंपर्क कार्यालय आजही खुलं असून,अनेक लोकांच्या अडीअडचणी असल्यास त्यांच्याशी सहज संवाद साधता येतो. हेच त्यांच्या नेतृत्वाचं खरे वैशिष्ट्य आहे.
*✦ संघटनात्मक नेतृत्व व पक्षवाढ*
युवा मोर्चातील कार्यकर्त्यापासून आज भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री होईपर्यंतचा त्यांचा प्रवास हा कर्तृत्वाचा इतिहास आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली जिल्ह्यात भाजपला पहिल्यांदाच सत्ता मिळाली. लोकसभा व तीन आमदार निवडून आले.
त्यांनी पक्षवाढीसाठी सातत्याने मेहनत घेतली आणि आदिवासी समाजाच्या मनात पक्षाबद्दल विश्वास निर्माण केला.
*✦ मान्यतांचा वर्षाव – कार्याची सन्मानपूर्वक नोंद*
🏅 “सांसद आदर्श पुरस्कार” – पुणे येथील युवा संसद
🏅 “राष्ट्रीय मानवाधिकार सन्मान”
🏅 “लोकमत लोकनायक पुरस्कार”
🏅 “Doctorate (Honoris Causa)” – South Western American University, USA
हे पुरस्कार त्यांच्या सेवाभावी, मूल्यनिष्ठ आणि लोककेंद्रित राजकीय जीवनाचे मानचिन्ह आहेत.
*✦ एक सुसंस्कृत, आत्मीय आणि खरा लोकनेता*
डॉ. अशोक नेते हे आजही संयमी, सुसंस्कृत आणि सामान्य जनतेशी आत्मीयतेने वागत असलेले सतत सक्रिय कार्यकर्ता आहेत.
“जनतेचे प्रश्न हेच आपले प्रश्न” हे तत्त्व त्यांनी कृतीतून जगासमोर ठेवले आहे.
“जनसेवा हीच ईश्वरसेवा” हे त्यांचे जीवनधर्म आहे – आणि त्याला त्यांनी यथार्थतेने सिद्धही केले आहे.
*🎉 वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! 🎉*
सामान्य माणसाचा आवाज, विकासाचे प्रतिबिंब, आणि समाजासाठी झटणारा एक खरा योद्धा – डॉ. अशोकजी नेते
त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, आणि जनतेच्या आशीर्वादासह यशाच्या अजून उंच शिखरावर पोहोचावं, हीच मनःपूर्वक शुभेच्छा!
✍️ प्रस्तुतकर्ते:
*दिवाकर रामदास गेडाम*
(मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांचे सहाय्यक व सोशल मीडिया प्रमुख)
📞 9370499136 / 9673757718