सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावर गडचिरोली भूषण पुरस्काराने सन्मानित

8

सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावर गडचिरोली भूषण पुरस्काराने सन्मानित

 

आज दिनांक 30 जून 2025 रोजी दुपारी दोनच्या सुमारासन नागपूर येथील हॉटेल सेंटर पॉईंट रामदास पेठ येथे “गडचिरोली भूषण 2025” या सन्मान सोडायच्या आयोजन करण्यात आली होती या सन्मान सोडेला उर्मिला कानेटकर प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री सिद्धार्थ गायकवाड प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग नागपूर विनायक महामुनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर वामनराव चटक माजी आमदार राजूरा विधानसभा क्षेत्र तसेच अशोक नेते माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजप अनुसूची जनजाती मोर्चा लाईकराम भंडारकर जिल्हा परिषद अध्यक्ष गोंदिया हे प्रामुख्याने उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्यातील प्रसिद्ध समाजसेवक संतोष ताटीकोंडावार यांना यावेळेस गडचिरोली भूषण सन्मान 2025 ने सन्मानित करण्यात आले.

 

श्री. संतोष भाऊ ताटीकोंडावार यांनी समाजसेवेसाठी स्वतःला समर्पित केले असून, त्यांच्या उत्कृष्ठ कार्यामुळे शेकडो नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आले आहेत. त्यांची समाजासाठी केलेली कामगिरी अत्यंत मोलाची असून, त्यांनी अनेक क्षेत्रात लक्षणीय योगदान दिले आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अनेक घोटाळे आणि भ्रष्टाचार उघड झाले आहेत, ज्यामुळे शासनाला लाखो रुपयांचा महसूल मिळाला आहे आणि समाजाच्या हिताचे संरक्षण झाले आहे.