_*चोरटी येथे बुद्ध-भीम-शिवराय गीतांचा स्वर दर्पण कार्यक्रम संपन्न*_

247

_*चोरटी येथे बुद्ध-भीम-शिवराय गीतांचा स्वर दर्पण कार्यक्रम संपन्न*_

 

_*माजी जि. प. सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले*_

 

_ब्रम्हपुरी_

_तालुक्यातील चोरटी येथे समता सैनिक दल व बौध्द समाज चोरटी यांच्या वतीने बुद्ध-भीम-शिवराय गीतांचा स्वर दर्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. *या स्वर दर्पण कार्यक्रमाचे उद्घाटन लोकमत चंद्रपूर जिल्हा भुषण पुरस्कार प्राप्त माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्या हस्ते पार पडले.*_

_या कार्यक्रमाचे दिप प्रज्वलन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव डॉ. नामदेराव किरसान यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून चोरटी गावच्या सरपंच सौ. निशाताई अमर मडावी उपस्थित होत्या. कार्यक्रमाला सह अध्यक्ष म्हणून मोंटूभाऊ पिलारे उपाध्यक्ष चं.जि.काँ.क., सहउद्घाटक म्हणून नामदेव लांजेवार उपाध्यक्ष तालुका काँ.क., उपस्थित होते. उपाध्यक्ष म्हणून रजनीकांत मोटघरे अध्यक्ष अ.जा.काँ.क. गडचिरोली उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून वकार खान सचिव शहर काँग्रेस ब्रम्हपुरी, सुरज मेश्राम शहर अध्यक्ष युवक काँग्रेस, सुनीताताई वलके पो.पा. चोरटी, रक्षित रामटेके आयसीआयसीआय फाउंडेशन ब्रम्हपुरी, सुधाकर कांबळे उपसरपंच चोरटी, सदानंद शेंडे सदस्य ग्रा.पं.चोरटी, राजु राऊत सदस्य ग्रा.पं.चोरटी, शालिक नन्नावरे सदस्य ग्रा.पं.चोरटी, राजेंद्र ठाकूर सदस्य ग्रा.पं.चोरटी, आशाबाई चंदनखेडे सदस्या ग्रा.पं.चोरटी, विनोद वासनिक सदस्य ग्रा.पं.अड्याळ, नेताजी पिसे, रमेश तलमले, आशीक मेश्राम, मुखरू रामटेके, हरिदास सोंडवले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते._

_या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमोदभाऊ चिमूरकर म्हणाले की, “बुद्ध-भीम-शिवराय गीतांचा स्वर दर्पण” कार्यक्रम म्हणजे महापुरुषांच्या जीवन कार्यावर गीतांच्या माध्यमांतून प्रकाश टाकने आहे. महाकारूनी तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य, विचार आपल्याला प्रेरणा देणारे आहेत. त्यांच्यावरील गायलेल्या गीतांनी आपण भारावून जात असतो. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपण आपले जीवन उज्वल करावे. असे प्रतिपादन त्यांनी केले._

_समता सैनिक दल व बौध्द समाज चोरटी यांच्या वतीने आयोजित बुद्ध-भीम-शिवराय गीतांचा स्वर दर्पण कार्यक्रमाचा गावकऱ्यांनी आनंद घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले._