*महाशिवरात्री निमित्त वांगेपल्ली येथे भाविकांची मांदियाळी.*

53

*महाशिवरात्री निमित्त वांगेपल्ली येथे भाविकांची मांदियाळी.*

 

*अहेरी इस्टेटच्या राजाने भाविकांची घेतली पुरेपूर काळजी.*

 

*अहेरी:-* नजीकच्या वांगेपल्ली गावालगत वाहणाऱ्या प्राणहिता नदीच्या काठावर प्राचीन महादेवाचे मंदिर आहे.याठिकाणी दरवर्षी महाशिवरात्री निमित्त मोठी गर्दी होते.याही वर्षी येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची मांदियाळी बघायला मिळाली.येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून माजी राज्यमंत्री तथा अहेरी इस्टेटचे राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी काळजी घेतली.

 

महाराष्ट्र आणि तेलंगाणा राज्याचे विभाजन करत वाहणाऱ्या प्राणहिता नदीच्या काठावर प्राचीन महादेव मंदिरात दरवर्षी महाशिवरात्री निमित्त मोठी जत्रा भरते.येथील प्राणहिता नदी पात्रात शाहीस्नान करून भाविक महादेव मंदिरात दर्शन घेतात.यंदाही महाराष्ट्र, तेलंगाणा आणि छत्तीसगड या तीन राज्यातील भाविक पहाटेपासून याठिकाणी भाविकांनी हजेरी लावली होती.अहेरी नगरीत विविध राज्यातून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही याची राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विशेष काळजी घेण्याचे निर्देश दिले.त्याअनुषंगाने वांगेपल्ली येथील घाटावर महाप्रसाद,साबुदाणा वडे,रताळ,दूध,केळी आणि थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली. विशेष म्हणजे गरमागरम पदार्थ मिळाल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले.

 

कुठलीही जत्रा म्हणजे लाखोंच्या संख्येने भाविकांची हजेरी असते.अश्यावेळी काही काळासाठी महाप्रसाद वाटप करून फोटो सेशन झालं की सर्वकाही गुंडाळले जाते. मात्र,असे न करता राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी भाविकांसाठी सतत स्टॉल सुरू ठेवून नवनवीन पदार्थ खायला धातले.यात कुठल्याही खाद्य पदार्थांची कमतरता भासू दिली नाही.या कामासाठी अहेरी परिसरातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेतले.

 

*कार्यकर्त्यांकडून भाविकांची आस्थेने विचारपूस*

 

महाशिवरात्रीनिमित्त वांगेपल्ली घाटावर भाविकांची गर्दी बघता माजी राज्यमंत्री तथा अहेरी इस्टेटचे राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे कार्यकर्ते याठिकाणी उपस्थित राहून भाविकांची काळजी घेतली.आपल्या हस्ते फळ व विविध खाद्य पदार्थ वाटप केले.एवढेच नव्हेतर महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वतः खाद्यपदार्थ तयार केले.त्यामुळे भाविकांची गैरसोय टळली. स्वादिष्ट पदार्थ खायला मिळाल्याने भाविकांनी देखील अहेरी इस्टेटचे राजे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले.!