आमदार , मंत्री , सिनेकलाकारांनी भोलुभाऊ सोमनानी च्या वाढदिवशाच्या कार्यक्रमास लावली हजेरी.
वृत्तवाणी न्यूज गडचिरोली गडचिरोली – आरमोरी तालुक्यातील वैरागड येथील प्रतिष्ठीत व्यापारी भोलुभाऊ सोमनानी याचा वाढदिवश थाटामाटात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवशाच्या कार्यक्रमात अन्न व औषध प्रशासन मंत्री राजे धर्मराव बाबा आत्राम , आमदार डॉ. देवराव होळी , सहकार महर्षी अरविद सावकार पोरेड्डिवार , आमदार कृष्णा गजभे तर मुख्य आकर्षक म्हणून सिनेतारका सोनाली कुळकर्णी , पद्श्री डॉ. परशुराम खुणे ‘ भाजपाचे जिल्हा सचिव दिलीप चलाख , प्रतीक राठीआदि सहीत अन्य प्रतिष्ठीत नागरिक व शुभचिंतकांनी हजेरी लावली. याप्रसंगी सिनेतारका सोनाली कुळकर्णी हिने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोष करून मार्गदर्शन केले तर अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की लोकसभा निवडणुकीत मला निवडुन दिले तर मी गडचिरोली जिल्हयाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. अनेक मान्यवरांनी भोलु सोमणांनी यांच्या जिवन कार्यावर स्तृति सुमने उथळली. गरीबों का मशिहा असाही उल्लेख करण्यात आला. त्यांच्या वाढदिवशा निमित्य त्यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी म्हणुन भेट देणार असल्याचे बोलल्या जात असुन वैरागड परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते. मात्र सुरजागड पहाडीच्या पाहुण्याची कमतरता भासली. भोलूभाऊ सोमनानी यांनी उपस्थितीताचे आभार मानले .