*आशा स्वयंसेविका या महत्त्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून काम करतात*                    *– गीता हिंगे*

95

*आशा स्वयंसेविका या महत्त्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून काम करतात*

*– गीता हिंगे*

जागतिक महिला दिना निमित्य भाजप महिला आघाडी तर्फे गडचिरोलीच्या आशा वर्कर यांचा सत्कार*

गडचिरोली दि.13-3-2024

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा गडचिरोली तर्फे जिल्हाध्यक्षा गीताताई हिंगे यांच्या नेतृत्वात जागतिक महिला दिना साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षा भाजप महिला आघाडी च्या जिल्हाध्यक्षा गीताताई हिंगे तर प्रमुख अथिती म्हणून भाजप च्या महामंत्री योगिताताई पिपरे, महिला समुपदेशिका वैशाली बांबोळे होत्या.जागतिक महिला दिना निमित्य गडचिरोलीच्या सर्व आशा वर्कर तसेच महिला समुपदेशिका वैशाली बांबोळे यांचा सत्कार करण्यात आला. आपल्या अध्यक्षीय भाषणात गीताताई हिंगे म्हणाल्या “घरची सगळी कामं उरकून सकाळी साडेआठ वाजता आशा स्वयंसेविका यांना कामाच्या ठिकाणी पोहचावं लागतं. कधी लसीकरणाची ड्युटी असते, तर कधी गावात जाऊन जनजागृती करण्याची. आरोग्य हा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असून आरोग्य यंत्रणा, सेवाभावी संस्था ग्रामस्थ आणि समाजातील अन्य घटकांमध्ये आरोग्या संदर्भात जनजागृती करणे, सुसंवाद घडवून समन्वय करणे, प्रोत्साहन देणे, वाटाघाटी निर्माण करणे यादृष्टीने ‘आशा स्वयंसेविका’ महत्त्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून काम करतात.आणि म्हणूनच त्यांचा सत्कार करताना मला अतिशय आनंद होतो आहे. कार्यक्रमाचे सूत्र संचालन भाजप च्या सचिव वर्षा शेडमाके यांनी तर आभार प्रदर्शन भाजप च्या जिल्हा सचिव सीमा कन्नमवार यांनी केले. यावेळी रेखा उईके,भूमिका बरडे,सुनीता आलेवार,प्रतिमा सोनवणे, रोशनी राजुरकर,ज्योती पाटील,पूनम हेमके,भारती खोब्रागडे व अन्य भाजप च्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या