भाजपच्या बालेकिल्ल्यात भाजपलाच उमेदवारी द्या
भाजपा पदाधिकारी यांची पत्रकार परिषद
वृत्तवानी न्युज, गडचिरोली (दि,१९ मार्च)
मागील २० ते २५ वर्षापासून गडचिरोली मध्ये भारतीय जनता पार्टीने विजय संपादन करून आपला बालेकिल्ला बनवलेला आहे तरी येत्या लोकसभा निवडणुकीत गडचिरोली-चिमूर क्षेत्रातून भाजपलाच उमेदवारी द्यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील अनेक पदाधिकाऱ्यांनी आज अशोक नेते यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेतून केली आहे.
लोकसभा २०१४,व २०१९ ला भरपूर मताधिक्यने भारतीय जनता पार्टीने विजय खेचून आणलेला आहे. परिणामी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार उभा करावा अशी माहिती सुद्धा पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
पत्रकार परिषदेला भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, चामोर्शीचे नगरसेवक आशिष पिपरे, रमेश भुरसे किसान आघाडी, विनोद अतुकलमवार, रंजीता कोडाप जिल्हा सचिव, डॉ,शाम कृपपविर प्रदेश कार्यकारणी सदस्य, प्राध्यापक अनिल बारसागडे, लता पुंगाटी धानोरा अध्यक्ष, निखिल गादेवार, प्रणय खुणे जिल्हा उपाध्यक्ष, डॉ भारत खटी, मोहन मते यांचे सह अनेक तालुका अध्यक्ष व पदाधिकारी व कार्यकर्ते पत्रकार परिषदेला हजर होते.