बुलेट राणी (साध्वी राजलक्ष्मीजी) या बुलेट ने 2100km चा प्रवास करीत( मदुराई ते गडचिरोली ) दि 17-3-2024 रोज रविवारी संध्याकाळी 6 वा. गडचिरोलीत आगमन झाले. त्यांचे इंदिरा चौकात भाजपा महिला आघाडी तसेच युवा मोर्चा तर्फे मा.खासदार अशोक नेते,जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, बाबुरावजी कोहळे,रमेशजी भुरसे, प्रकाशजी गेडाम, दामोदरजी अरगेला,प्रशांत भृगवार, सुशील हिंगे यांच्या उपस्थितीत त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीता हिंगे,जिल्हा सचिव वर्षा शेडमाके, सीमा कन्नमवार व इतर महिला पदाधिकाऱ्यांनी साध्वी राजलक्ष्मी यांचे इंदिरा चौकात तिलक लाऊन स्वागत केले.तसेच 18-3-2024 रोज सोमवारी बुलेट राणी राजलक्ष्मीजी सोबत गडचिरोली शहरातील मुख्य मार्गावरून भारत माता की जय, वंदे मातरम, फूल नही चिंगारी है हम भारत की नारी है असा जयघोष करीत बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, महामंत्री प्रकाशजी गेडाम,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा गीताताई हिंगे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल तिडके,शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, केशव निंबोळ, जिल्हा सचिव वर्षा शेडमाके, महामंत्री त्रिशा डोईजड, लक्ष्मीताई कलंत्री, सीमा कन्नमवार, स्वाती चंदनखेडे, सुनीता आलेवार, रोशनी राजूरकर, भारती खोब्रागडे तसेच अन्य महिला पदाधिकारी व युवा कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.