*सिंगांपेठ येथील गणपती डोके या अपघात ग्रस्ताला*
*माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी दिला आधार.!*
*अहेरी:-* सिंगांपेठ येथील गणपती डोके व मुनाजी तलांडे यांच्या दुचाकी वाहनाचा लगाम नाक्या जवळ अपघात झाला त्यात ते गंभीर जखमी झाले त्यामुळे त्याना अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या दोघांपैकी गणपती डोके यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना गडचिरोली जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यासाठी अडचण झाली.ही माहिती राजे फोटोग्राफर रविभाऊ जोरगीलवार यांना कळताच त्यांनी माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना लक्षात आणून दिली त्यावेळी राजे साहेबांनी अपघात ग्रस्ताला तात्काळ अम्बुलान्स उपलब्ध करून दिली व पेट्रोल टाकून दिले.यामुळे गणपती डोके कुटूंबाला आधार मिळाला.
यावेळी समस्त डोके कुटूंबाने राजे साहेबांचे मनःपूर्वक आभार मानले..!