सख्ख्या चुलत भावाने अल्पवयीन बहिणीवर केला अत्याचार.
भद्रावती तालुक्यातील लोणारा येथील घटना.
भद्रावती – सख्या चुलत भावाने 17 वर्षीय अल्पवयीन बहिणीवर अत्याचार केल्याची घटना घडली. या घटनेची तक्रार पीडित मुलीच्या आईने भद्रावती पोलीस स्टेशनला देताच आरोपीला अटक करण्यात आली.
प्रेमकुमार दिलीप सोनटक्के वय 23 रा.सोनेगाव जिल्हा चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे. पिडीत मुलगी लोणारा येथे रहात असून ती डिसेंबर महिन्यात आपल्या काकाच्या घरी सोनेगाव येथे गेली होती. त्या दरम्यान ती रात्रीच्या वेळेस झोपी गेली असताना तिच्या चुलत भावाने तिचे वर अत्याचार केला. व या घटनेची माहिती घरच्या कुणालाही दिली तर जीविताचे काहीही करील अशी धमकी त्याने दिली . पीडित मुलगी भद्रावती येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असल्याने तिच्या चुलत भावाने वारंवार धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला . ही बाब पीडित मुलीच्या आईला माहिती होताच या घटनेची तक्रार बुधवारला पोलिसात दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ठाणेदार सुनील सिंग पवार यांनी आरोपीला सोनेगाव येथून अटक केली