*आलापल्ली येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा खा.अशोक नेते यांच्या प्रचारार्थ प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

12

*आलापल्ली येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा खा.अशोक नेते यांच्या प्रचारार्थ प्रचार कार्यालयाचे उद्घाटन…. महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री मान.धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते संपन्न झाले…….*

 

 

 

दि.०४ एप्रिल २०२४

(आलापल्ली)

 

आज दि.०४ एप्रिल रोज गुरूवारी महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा विद्यमान खासदार अशोकजी नेते यांच्या प्रचारार्थ प्रचार कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री मान.धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते व महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा खा.अशोक नेते यांचे प्रमुख उपस्थितीत वेलगुर रोडवरील आलापल्ली येथे पार पडले.

 

या बैठकीला प्रामुख्याने लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवींद्र ओल्लालवार,प्रदेश सचिव ऋतुराज हल्लगेकर, युवा राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर,राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे,जिल्हा उपाध्यक्ष दामोदर एरिगेला,मच्छीमार आघाडी चे जिल्हाध्यक्ष मोहन मदने,जिल्हा उपाध्यक्ष विनोद आकनपल्लीवार, युवा नेते सागर डेकाटे,रहीमा सिद्धीकी,पुष्पा अलोने,पोर्णिमा ईसटाम तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.