*मूल शहरातिल मुस्लिम बांधव यांचे सहित अनेक युवकांचा शिवसेना उ.बा.ठा. पक्ष्यात प्रवेश*

58

*मूल शहरातिल मुस्लिम बांधव यांचे सहित अनेक युवकांचा शिवसेना उ.बा.ठा. पक्ष्यात प्रवेश*

मुल..राज्याच्या राजकारणात दिवसेंदिवस होणारा बदल व सध्याची परिस्थिती बघता युवकांचा कल शिवसेना ठाकरे गटाकडे वाढतच आहे.

 

देश्यातिल राजकरण जाती भेदी चा सुरु असताना राज्यांत मात्र मान.पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचे विचार सर्व धर्म समभावाचे असुन ८० टक्के समाज कारन आणि २० टक्के राजकरण या विचारावर अनेक युवकांचा कल मात्र शिवसेना उबाठा कड़े वळून राहिला आहे.

याच विचाराची मशाल घेऊन जय भवानी जय शिवाजी च्या जय घोश्यात

मुल शरातील मुस्लिम बांधव समवेत अनेक युवकांनी काल शुक्रवार दि.५ अप्रैल.रोजी शिवसेना (उ.बा.ठा) प्रवेश केला.

सदर पक्षप्रवेश कार्यक्रम शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार यांचे उपस्थितीत शिवसेना कार्यालय येथे पार पडला.

 

शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप भाऊ गिऱ्हे

यांचे धडाडीचे कार्य बल्लारपुर विधानसभा क्षेत्रात सुरु आहे.. याच कार्याची पावती म्हणून जिल्हाप्रमुख संदीप भाऊ गिऱ्हे

यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शहर प्रमुख आकाश अजय राम आनी तोहिद शेख यांच्या नेतृत्वात शहरातील अनेक मुस्लिम बांधव तसेच युवकांनी पक्ष प्रवेश केला, यावेळी संदीप भाऊ गिऱ्हे यांनी जनसेवे करिता उभारलेले शिवसेना कार्यालय आज सर्व धर्म समभावांचे मंदिर बनले असुन संदीप भाऊंच्या मार्गदर्शनात प्रशांत गट्टूवार यानी अरबाज भाई शेख, सय्यद उर्फ बाबू सय्यद अली,इमरान शेख,इरशाद पठान सूरज अत्राम सैफ महाजन, यांच्या गळ्यात दुपट्टा टाकत शिवसेना परिवारात स्वागत केले. तसेच युवकांना मार्गदर्शन करताना श्री प्रशांत गट्टूवार यानी सांगितले की हा कार्यालय संदीप भाऊ नी मूल शहरातिल समस्या सोडविन्यासाठी तयार केला असुन वाढती बेरोजगारी आणि शहरातिल असंख्य समस्या आहेत ते सोडविण्याचे आश्वासन नवीन युवा पिढ़ीला दिले.मुल शहरात मान. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेवा केंद्र जनसंपर्क कार्यालय सुरू असून शहरातील व तालुक्यातील गोरगरिबांचे प्रश्न २४ तास सेवा भावातुन कर्यालातून सोडविण्यात येतील असे आपल्या मार्गदर्शनातून सांगितले.यावेळी शहर प्रमुख आकाश अजय राम यांनी वार्ड तिथे शाखा घर तीथे शिव सैनिक हा संकल्प यावेळी हाती घेताला.

या वेळी शहर प्रमुख अमित आयलानी यांची प्रमुख उपस्थिति होती.

पक्षप्रवेश घेनारे इमरान शेख,सौरव गिरडकर,कृष्णा अंमदुर्तिवार,सरफराज पठान,सन्नी रिजवी,तोहिद शेख याटो यूनियन सदस्य,यासीर शेख, तोफिक पठान,समीर शेख तसेच असंख्य मुस्लिम बांधव समवेत अनेक कार्यकर्त्यांच शिवसेनेत प्रवेश घेण्यात आला.