Home Breaking News उभ्या ट्रकला मागून येणाऱ्या भरधाव ट्रकची जबर धडक, महाकाली पेट्रोल पंपाजवळील घटना

उभ्या ट्रकला मागून येणाऱ्या भरधाव ट्रकची जबर धडक, महाकाली पेट्रोल पंपाजवळील घटना

267

उभ्या ट्रकला मागून येणाऱ्या भरधाव ट्रकची जबर धडक, महाकाली पेट्रोल पंपाजवळील घटना

 

 

आष्टी : परीसरात अपघातांच्या सत्रात वाढ झाली असून एक दिवसाआड अपघातांची मालिका सुरूच आहे. आष्टी चामोर्शी मार्गावर उभ्या ट्रक ला मागून येणाऱ्या भरधाव ट्रक ने जबर धडक दिल्याने ट्रकचालक गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 4 मे शनिवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली.

 

शुभाष मेश्राम रा. डोंगरगाव ता. अर्जुनी जिल्हा गोंदिया असे जखमी ट्रकचालकाचे नाव आहे.

आष्टी चामोर्शी मार्गावरील महाकाली पेट्रोलपंपच्या समोर CG 07 BK 4515 क्रमांकाचा ट्रक लोखंडी सळाखी भरलेला ट्रक उभा होता या या ट्रक ला CG 04LP 4429 या क्रमांकाच्या सळाखी भरलेल्या ट्रकने मागून जबर धडक दिली. यावेळी क्लिनर हा ट्रक चालवीत होता तर ट्रकचालक डाव्या बाजूला होता. या धडकेत ट्रकचालकाचा एक पाय तुटला. तर वाहन चालवीत असणारा क्लिनर मात्र सुखरूप आहे. घटनेची माहीती कळताच आष्टी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमीला आष्टी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Don`t copy text!