Home Breaking News गडचिरोली पोलीस दलातील मृत जवानांच्या कुटुंबियांना अॅक्सिस बँकेने दिला मदतीचा हात

गडचिरोली पोलीस दलातील मृत जवानांच्या कुटुंबियांना अॅक्सिस बँकेने दिला मदतीचा हात

246

गडचिरोली पोलीस दलातील मृत जवानांच्या कुटुंबियांना अॅक्सिस बँकेने दिला मदतीचा हात

 

गा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) सा. यांचे हस्ते कुटुंवियाला १० लाख रुपयाचा धनादेश स्वाधीन

 

बैंक म्हणजे ग्राहकांचे पैसे सांभाळणारी किया त्यांना कर्ज देणारी यंत्रणा अशी नागरीकांमध्ये ओळख असून एक पाऊल पुढे जात आपल्या खातेधारकांच्या जियाला थोका निर्माण झाला तर त्यांच्या कुटुं‌चियांना आर्थीक आधार देण्याचा नवा आदर्श अॅक्सिस बँकेने ठेवला आहे. दिनांक ०७/०२/२०२४ रोजी गडचिरोली पोलीस दलातील कार्यरत कर्मचारी बहादुर पेन्टा सिडाम यांचे हृदय विकाराने निधन झाले होते त्यामुळे त्यांच्या कुटुंबियावर मोठे संकट कोसळले. ही समस्या ओळखुन अॅक्सिस बँकेने मदतीचा हात पुढे करीत त्यांच्या पश्चात पत्नी श्रीमती पुष्पा बहादुर सिडाम यांना आर्थीक मदत स्वरुपात मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिता सा. यांचे हस्ते आज दि. ०७/०५/२०२४ रोजी १० लाख रुपयाचा धनादेश अदा करण्यात आला. यावेळी मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल मा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिता सा, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा. तसेच अॅक्सिस बँकेचे शाखा व्यवस्थापक, श्री. राकेश राजेंद्र वल्लालवार व उप-शाखा व्यवस्थापक श्री. मुर्लीपर नैताम यांचे उपस्थितीत मृत्त कर्मचा-यांच्या कुटुंचियांना धनादेश स्वाधीन करण्यात आला.

Don`t copy text!