*बाजारवाडीतील विविध समस्या सोडवा अन्यथा आंदोलन करू – दिपाली मुकेश नामेवार, नगर सेविका*

69

*बाजारवाडीतील विविध समस्या सोडवा अन्यथा आंदोलन करू – दिपाली मुकेश नामेवार, नगर सेविका*

 

 

*आलापल्ली :- अहेरी नगर पंचायत अंतर्गत प्रभाग क्र. ६ मधील बाजारपेठेतील दुर्गंधी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. चिकन-मटन दुकानदार हे, कोंबडी, मटनचे मांस मोठ्या प्रमाणात खुल्यावर फेकून देत असल्याने त्यातुन संम्पुर्ण परिसरात कुत्र्यांचा हैदोस वाढला, दुर्गंधी मोठ्या प्रमाणात वाढली, डासांची उत्पत्ती होत असून डासांपासून होणाऱ्या प्राणघाती मलेरिया, डेंग्यु सारखी आजार साथ होण्यास नाकारता येत नाही. बाजारवाडीत असलेल्या निवासी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.*

*मास मच्छी चे वेस्टेज उघळ्यावर फेकल्याने १५-२० कुत्र्यांचा धुमाकुळ असतो.*

*बाजारवाडीतून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या मागे कुत्रे धावल्या जातात म्हणून नागरिक भयभीत होतात.*

*बाजारवाडीत सुरू असलेल्या शेड चे कामाकरीता खड्डे खोदून ठेवले आहे त्यात लहान जनावरे, नागरिक पडल्या जात आहे.*

*बाजारवाडीतील हायमास्ट व बँक ऑफ महाराष्ट्र समोरील हायमास्ट वेळोवेळी बंद पडल्या जात आहे या कडे नगर पंचायत लक्ष देण्यात यावे असे विविध समस्यांना घेऊन मुख्याधिकारी नरेंद्र दाते यांना निवेदन नगर सेविका दिपाली मुकेश नामेवार सह प्रभाग क्रमांक ६ मधील रमेश समुद्रालावार, सुरेश रामगोनवार, गुळघाने,मुकेश नामेवार, र्श्रीकांत गदेवार,पंकज नौनुरवार उपस्थित होते.*

*वरील सर्व समस्या लवकरात लवकर सोडवा अन्यथा प्रभागातील नागरिकांना घेऊन नगर सेविका आंदोलन करणार असे इशारा देण्यात आले आहे.*