डी आर्ट लिविंग चे संस्थापक व आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर जी यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा

27

डी आर्ट लिविंग चे संस्थापक व आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर जी यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा

 

डी आर्ट ऑफ लिविंग चे संस्थापक परमपुज्यनीय विश्वाचे आध्यात्मिक गुरु श्री श्री रवीशंकर जी यांचा ६८ वा वाढदिवस गडचिरोली शहरामध्ये व जिल्ह्यात मोठ्या हर्ष व उल्लासात त्यांच्या परिवारातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून साजरा करण्यात आला.

 

आज सकाळी ६ वाजता श्री साई मंदिर चामोर्शी रोड येथे सकाळी ६ ते ७ या वेळात गुरुदेवांच्या आवाजात शार्ट क्रिया कार्यक्रम साजरा करण्यात आला, त्यानंतर लगेच चामोर्शी रोडवरील वृद्धाश्रमामध्ये तेथील वृद्ध लोकांना आर्ट ऑफ लिविंग च्या पदाधिकारी व कार्यकर्त्याकडून पुष्पगुच्छ देऊन,फळवाटप व नाश्ता तसेच जीवन उपयोगी वस्तूचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

 

सायंकाळी ७ ते ९ वाजता गुरुदेव पुजा, सत्संग, गणेश वंदना, गुरु, शिव, देवी, नारायण असे विविध भजन व स्नेहभोजनाचा आयोजन करून रविशंकरजी यांच्या ६८ व्या वाढदिवसाचा समारोप करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठीआर्ट ऑफ लिविंग चे टीचर अमोल दशमुखे,माधुरी दहिकर, भुजंग हिरे, कंबगौणी, नंदू सरडे, सचिन हर्षे, राजू पवार, रुपेश वलके, शांतीलाल सेता, रमेश सारडा समवेत साधके व महिला व बालगोपाल हजर होते