*महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाची शिक्षकांच्या ज्वलंत प्रश्नावर सन्मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आयुषी सिंह मॅडम यांचेशी भेट व चर्चा

45

*महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गडचिरोली*  *महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाची शिक्षकांच्या ज्वलंत प्रश्नावर सन्मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आयुषी सिंह मॅडम यांचेशी भेट व चर्चा. दिनांक -14/05/2024 👉महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा गडचिरोली* चे वतीने *सन्मा .मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आयुषी सिंह मॅडम यांना निवेदन देऊन शिक्षकांच्या समस्यांबाबत अवगत करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने… ▪️1)उन्हाळी दीर्घ सुट्टी कालावधीतील दोन महिन्यांचा प्रोत्साहन भत्ता व वाहतूक भत्ता नियमित मिळणे*. ▪️ *2)गडचिरोली जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे नियमित वेतन दरमहा 1 तारखेला करण्यात यावे. ▪️3)पदवीधर शिक्षक पदोन्नती व विषय शिक्षक पदोन्नती त्वरित करण्यात यावी. ‌ ▪️4)आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना‌ एक आगाऊ वेतनवाढ त्वरित देण्यात यावी. ▪️5)बंद झालेली अतिरिक्त घरभाडे भत्ता टॅब पुर्ववत सुरू करण्यात यावी. ▪️6)प्रलंबित जि.पि.एफ.परतावा/ना-परतावा प्रकरणे त्वरित निकाली काढण्यात यावे. ▪️7)उर्वरित वरिष्ठश्रेणी,निवडश्रेणी चे प्रस्ताव मागवुन ते त्वरित मंजूर करणे. ▪️8) 4 टक्के सादील अनुदान जि.प.शाळांना त्वरित अदा करणे. ▪️9)प्रशासकीय बदली प्रवास भत्ता देयके त्वरित अदा करणे. ▪️10)मयत शिक्षकांच्या पेन्शन केस त्वरित मंजुर करणे. ▪️11)न्यायालयीन प्रकरणातील समाविष्ट शिक्षकांची एकस्तर वेतन थकबाकी त्वरित अदा करण्यात यावे. 👉 वरील मुद्द्यांचे अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली. संघटनेसोबत चर्चेदरम्यान मान.मुख्य कार्यपालन अधिकारी मॅडमनी सर्व समस्या लवकरच निकाली काढण्याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केले. 👉 ▪️ यामध्ये प्रामुख्याने पुढील मे महिन्यापासूनचे नियमित वेतन पहील्या आठवड्यात करण्यात येतील . ▪️पदवीधर शिक्षक,विषय शिक्षकांची रिक्त पदे निवडणूक आचारसंहितेनंतर भरण्यात येतील. ▪️ आंतर जिल्हा बदलीने जिल्हा परिषद गडचिरोली येथे बदलीने आलेल्या शिक्षकांना एक आगाऊ वेतनवाढ लवकरच देण्याची कार्यवाही करण्यात येईल. ▪️ मयत शिक्षकांच्या पेन्शन केस त्वरित मंजुर करण्याबाबत संबंधित विभागाला सूचना देण्यात येतील. 👉याप्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री. रघुनाथ भांडेकर सर,जिल्हा कार्याध्यक्ष श्रीमती शीलाताई सोमनकर मॅडम,जिल्हा सरचिटणीस आशिष धात्रक सर,जिल्हा सल्लागार श्री भुजंगराव नारनवरे सर,जिल्हाउपाध्यक्ष श्री सुरेश वासलवार सर,जिल्हाउपाध्यक्ष श्री अशोक रायसिडाम सर,गडचिरोली तालुकाध्यक्ष श्री धनेश कुकडे सर, गडचिरोली तालुका सरचिटणीस श्री संजय मडावी सर,सिरोंचा तालुकाध्यक्ष श्री साईनाथ सोनटक्के सर आदी शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.*