*जिल्ह्यातील विविध समस्यांना घेऊन ; गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे जिल्हाधिकार्यांना निवेदन*

62

*जिल्ह्यातील विविध समस्यांना घेऊन ; गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे जिल्हाधिकार्यांना निवेदन*

 

गडचिरोली :: जिल्ह्यातील वारंवार रानटी हत्तीचे आगमन आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान यामुळे शेतकरी हावालदिल झाला असून, रानटी हत्तीच्या हल्ल्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी सोबतच रानटी हत्तीचा बंदोबस्त करण्यात यावा, याशिवाय जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक नागरिकांच्या घराची नुकसान झाली असून त्यांना देखील नुकसान भरपाई देण्यात यावी, उन्हाळी धान खरेदी केंद्र तात्काळ सुरु करून हमीभावाप्रमाणे सुरु करण्यात यावी यासह गडचिरोली शहरातील मुख्य रस्त्यावर अनेक भागात हलक्या पावसानेही पाणी जमा होऊन त्याठिकाणी नागरिकांना ये जा करण्याकरिता त्रास सहन करावा लागतो अश्या रस्त्यावर रस्ते वाहतूक विभागामार्फत मान्सून पूर्व दुरुस्ती करण्यात यावी अश्या

विविध समस्यांना घेऊन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी गडचिरोली यांना निवेदन देऊन समस्या सोडविण्याची मागणी केली.

यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान, जिल्हाउपाध्यक्ष नेताजी गावतुरे, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेल जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले,सोशल मिडिया अध्यक्ष संजय चंने,नदीम नाथानी,गौरव येनप्रेड्डीवार,विपुल येनप्रेड्डीवार,घनश्याम मुरवतकर सह काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.