रक्तदात्यांनी रक्तदान करून रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी सहकार्य करावे                    महेंद्र ब्राम्हणवाडे

26

रक्तदात्यांनी रक्तदान करून रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी सहकार्य करावे

महेंद्र ब्राम्हणवाडे

 

गडचिरोली शासकीय रक्तपेढीत रक्ताच्या अभावामुळे रुग्णांची गैरसोय होत होती.जिल्हा रक्तपेढीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत तात्काळ स्वरूपात सामाजिक भान जपणारा,नवंनियुक्त पोलीस उपनिरीक्षक सुरज कोडापे व त्यांच्या मित्र परिवाराने रक्तदान शिबिराचे आयोजन करून तात्पुरत्या स्वरूपात का होईना रक्तपेढीमध्ये रक्तदानाच्या माध्यमातून रक्त उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे या रक्तदानाच्या कार्यक्रमात जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र भाऊ ब्राह्मणवाडे,डॉ. किरसान साहेब,प्रदेश युवक काँग्रेस सचिव एड. विश्वजीत कोवासे यांनी प्रोत्साहन देऊन सहकार्य केले. यावेळी प्रामुख्याने रजनीकांत मोडघरे,सुरज पाल सचिन चरडूके, आदित्य भांडेकर व मित्रपरिवार प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्ह्यात रक्ताची वाढलेली मागणी व होत असलेला कमी पुरवठा याचा विचार करता जिल्ह्यातल्या पात्र रक्तदात्यांनी रक्तदान करून रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन या कार्यक्रमात या महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले.