* *जिल्हा परिषद हायस्कूल कुरुड चा निकाल शंभर टक्के*
( प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा शाळेने केला सत्कार)
जिल्हा परिषद हायस्कूल कुरुड या विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. परीक्षेला एकूण51 विद्यार्थी प्रविष्ट झाले त्यात51पैकी51 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्राविण्य श्रेणीत 19, प्रथम श्रेणीत 30 व द्वितीय श्रेणीत दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कु.स्मृती खुशाल पिलारे 85टक्के,कु. सानिया कैलास शामकुळे 84टक्के,कु.मृणाली दिवाकर तुपट 83टक्के,सुमित विलास भजने 82टक्के, कु.निहाली डाकराम घोडेस्वार 80टक्के आणि त्याच बरोबर प्रणय भाकरे, सानिया उके,राणी ठेंगरी,चैतन्य लोखंडे,सृष्टी राऊत, ख़ुशी शिंगाडे,समीक्षा बेद्रे, समीक्षा ठाकरे,प्रियंका राऊत, श्रानीय रामटेके, सौरभ वाघधरे,भूषण ठाकरे, सृष्टी चंदन,ऐश्वर्या पिलारे या विद्यार्थ्यांनी प्राविण्यश्रेणीत यश संपादन करून शाळेला नांव लौकिक मिळवुन दिले.
प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री वकील शेख यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना,पालकांना व शिक्षकांना मिठाईवाटून सर्वांचे तोंड गोड करण्यात आले.सदर सत्कार कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री दिनेश ठाकरे, शाळेतील शिक्षक सौ.अलामे श्री भानारकर,श्री सेलोकर,श्री रामटेके,श्री नाकाडे,कनिष्ठ सहा.श्री हर्षे,पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.