अतिप्रभावीत मेगा पाणलोट प्रकल्पाअंतर्गत गटा येथे EPRA संपन्न
धानोरा ता.प्र.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, Axis Bank Foundation, भारत रुरल लाईव्हलिहुड फाउंडेशन व वाटरशेड अर्गनायझेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महाराष्ट्र अतिप्रभावीत मेगा पाणलोट प्रकल्प’ राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने धानोरा तालुक्यातील गटा गावातील (ग्रा.पं. गटा ) येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत गावाचे PRA (सहभागी ग्रामीण मूल्यमापन) व शिवारफेरीचे आयोजन करण्यात आले. यादरम्यान वॉटर टीमने गुगल मॅपच्या साहाय्याने लोकसहभागातून सामाजिक नकाशा, जमिन वापर नकाशा, जमीन वर्गीकरण नकाशा असे विविध प्रकारचे नकाशे काढून गावकऱ्यांना गावशिवारातील विविध बाबींची ओळख करून दिली. सदर प्रकल्प पुढील पाच वर्षे चालणार असून ePRA च्या माध्यमातून मनरेगा अंतर्गत होणाऱ्या सर्व कामाचे नियोजन करून मृद व जलसंधारणाची कामे करण्यात येणार आहेत.
यावेळी गटा येथील सौ. विमलबाई केसरी उसेंडी ( ग्रा. प. सरपंच) श्री.केसरी उसेंडी( माजी सभापती), श्री सोनू पदा (ग्रामसभा अध्यक्ष), श्री. सुरेश उसेंडी ( ग्रामसभा सचिव),प्रतिष्ठित नागरिक व ईतर महिला पुरुष तसेच वाटरशेड आॅर्गनायजेशन ट्रस्ट अंतर्गत राबविण्यात येणार्या अतिप्रभावीत मेगा पाणलोट प्रकल्पाचे उपजीविका तज्ञ देवानंद जनबंधू, क्षेत्र समन्वयक विलास कांबळे, गजानन ढोबाळे, NRM तज्ञ निखील आसुटकर, इंजिनीअर शन्मुख मडावी व ईतर CRP उपस्थित होते.