निधन वार्ता.
गडचिरोली शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक भास्कर वासेकर यांचे लहान बंधू रवींद्र बिजाजी वासेकर (४६) यांचे आज सोमवारी, दुपारी २ वाजताच्या सुमारास कर्करोगाने नागपूर येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, एक भाऊ, दोन बहिणी,एक मुलगी, एक मुलगा असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण व्यापारीवर्ग,आप्त स्वकीय तसेच मित्र परिवरामध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या मंगळवारी,सकाळी ९ वाजता येथील वैनगंगा नदीच्या बोरमाळा घाटावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे