Home Breaking News भाजपाचे अशोक नेते यांचा दारुण पराभव  काॅंग्रेसचे डॉ...

भाजपाचे अशोक नेते यांचा दारुण पराभव  काॅंग्रेसचे डॉ नामदेव किरसान यांचा विजय

168

भाजपाचे अशोक नेते यांचा दारुण पराभव

 

काॅंग्रेसचे डॉ नामदेव किरसान यांचा विजय

 

लोकसभा निवडणुक २०२४ मध्ये आज झालेल्या ४ जून रोजी झालेल्या मतगणनेच्या दिवशी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र येथे महाविकास आघाडी चे उमेदवार डॉ. नामदेव किरसान हे १ लाख ४० हजार २३४ मतांनी विजयी झालेले आहेत.

 

डॉ नामदेव किरसान यांनी महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांचा जवळपास १ लाख ४० हजार २३४ मतांनी पराभव केलेला आहे.

 

आज झालेल्या मतमोजणीत सुरुवातीपासूनच मतांची आघाडी घेतलेल्या नामदेव किरसान यांनी कुठेही पिछाडी झाली नाही व जवळपास पूर्ण मतमोजणी च्या फेऱ्या पूर्ण होत पर्यंत आपले मताधिक्य कायम ठेवले.व आपला विजय पूर्ण केला.

 

कार्यकर्त्यांच्या जल्लोष व विजयी रॅली

¶¶

गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातून डॉ.नामदेव किरसान हे विजय झाल्याने क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गडचिरोली शहरात भव्य फटाक्यांची आतिषबाजी व रॅली काढून जल्लोष साजरा केला.

 

गडचिरोली भाजपा कार्यालयात शुकशुकाट

¶¶

रोज गजबजलेल्या भारतीय जनता पार्टीच्या चामोर्शी रोडवरील कार्यालयात आज अशोक नेतेंच्या दारुण पराभवाने झाल्याने शुकशुकाट पसरला होता.

Don`t copy text!