Home Breaking News *नवनिर्वाचित काँग्रेस खासदारांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे कडून सत्कार*

*नवनिर्वाचित काँग्रेस खासदारांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे कडून सत्कार*

150

*नवनिर्वाचित काँग्रेस खासदारांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे कडून सत्कार*

 

*लोकसभा निवडणूकीप्रमानेच आगामी विधानसभा निवडणुकीत सुद्धा काँग्रेस ला राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनविणार* – नाना पटोले

 

गडचिरोली :: 2019 लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा एक खासदार होता, आज 2024 ला काँग्रेस पक्षाचे 13 खासदार निवडून आले असून काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या विजयमागे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा मोठा वाटा आहे. तर काँग्रेस पक्षाला लोकसभेतच नाही तर विधानसभेत देखील सर्वात मोठा पक्ष बनविण्याचा निर्धार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानापटोले यांनी केलेला आहे.

मुंबई येथील टिळक भवन या प्रदेश कार्यालयात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष मा.आ.नानाभाऊ पटोले यांनी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे चे नवनियुक्त खा. डॉ. नामदेवजी किरसान, गोंदिया भंडारा चे खा. डॉ.प्रशांत पडोले, नांदेड लोकसभा चे खा. वसंतराव चव्हान यांचे अभिनंदन करून सत्कार केले. यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे देखील उपस्थित होते. उपस्थितितानी महाराष्ट्र मध्ये काँग्रेस पक्ष ला मिळालेल्या घवघवीत यशा बद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना देखील शूभेच्छा दिल्या.

Don`t copy text!