Home Breaking News *पंतप्रधान मोदींचा तिसरा शपथविधी उत्सवरुपात साजरा करा – अशोक नेते*

*पंतप्रधान मोदींचा तिसरा शपथविधी उत्सवरुपात साजरा करा – अशोक नेते*

93

*पंतप्रधान मोदींचा तिसरा शपथविधी उत्सवरुपात साजरा करा – अशोक नेते*

सोहळ्यासाठी मा.खा.नेते दिल्लीसाठी रवाना

*मा.खा.अशोकजी नेते शपथविधीच्या सोहळ्याला दिल्ली येथे उपस्थित राहणार…..*

 

गडचिरोली : विश्वात सर्वश्रेष्ठ लोकशाही असलेल्या भारत देशाचे विलक्षण लोकप्रिय, यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “विकसित भारताचे” स्वप्न साकार करण्यासाठी, कोट्यवधी जनतेच्या आशिर्वादाने ते तिसऱ्यांदा पंतप्रधानपदावर विराजमान होणार आहेत. हा अतिशय विलक्षण, ऐतिहासिक शपथविधी सोहळा आज रविवार दिनांक ९ जून रोजी सायंकाळी घटी मुहूर्तावर संपन्न होणार आहे. या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार अशोक नेते दिल्लीला रवाना झाले आहेत.

सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांना विराजमान होण्याचा हा ऐतिहासिक सोहळा प्रत्येक गावात, घराघरांसमोर फटाके फोडून, गुलाल उधळून आणि मिठाई, पेढे भरवून उत्सवरूपाने साजरा करा, असे आवाहन मा.खा.अशोक नेते यांनी केले आहे.

Don`t copy text!