Home Breaking News डोड्डी गावाजवळ दोन दुचाकीची समोरासमोर धडक; अल्पवयीन बालक जागीच ठार

डोड्डी गावाजवळ दोन दुचाकीची समोरासमोर धडक; अल्पवयीन बालक जागीच ठार

140

डोड्डी गावाजवळ दोन दुचाकीची समोरासमोर धडक; अल्पवयीन बालक जागीच ठार

 

एटापल्ली; (जिल्हा गडचिरोली) पासून पाच किमी अंतरावर जिवनगट्टा व डोड्डी गावांच्या मधल्या रस्त्यावर दोन दुचाकीत आमनेसामने झालेल्या धडकेत मैनू चैतु बोगामी (वय १७) रा उडेरा हा अल्पवयीन बालक जागीच ठार झाला आहे.

 

चैतु बोगामी हा अल्पवयीन बालक (१२ जून) बुधवारी दुपारी दोन वाजता दरम्यान उडेरा वरून एम एच ३३ एक्स ७१५४ क्रमांकाच्या दुचाकीवरून डोड्डी या गावाकडे जात होता, त्याच वेळी डोड्डीकडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या एक अज्ञाताच्या दुचाकीने मैनुच्या दुचाकीला जोरदार धडक दिली यात मैनू बोगामी याचा जागीच मृत्यू झाला, घटनेच्या माहितीवरून आरोग्य सेवेच्या १०८ रुग्ण वाहिकेतून मैनू याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे, घटनेचा पुढील तपास एटापल्ली पोलिसांकडून केला जात आहे.

Don`t copy text!