Home Breaking News *कल्याण शाखा वीज कंपनी सेवकाची सहकारी पतसंस्था गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभ*

*कल्याण शाखा वीज कंपनी सेवकाची सहकारी पतसंस्था गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभ*

211

*कल्याण शाखा वीज कंपनी सेवकाची सहकारी पतसंस्था गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभ*

*********************************

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेच्या अधिपत्याखाली असलेली वीज कंपनी सेवकाची सहकारी पतसंस्था मर्यादित कल्याण गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभ कॉमेड कृष्णा भोयर सरचिटणीस वर्कर्स फेडरेशन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आल्या होता.या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून मा.विजय डेंगळे MPSC/UPSC परीक्षा मार्गदर्शक,कॉम्रेड टि.सी. भोईर ज्येष्ठ वीज कामगार नेते,सौ.भारती भोयर महिला आघाडी अध्यक्ष,कॉम्रेड जि.आर.पाटील विश्वस्त कल्याणी निधी,कॉम्रेड मच्छिंद्र आडे, सौ.रेवती धादवड केंद्रीय कार्यकारणी सदस्य,कॉम्रेड संतोष चचाणे झोनल सचिव कल्याण झोन,सुरेश पवार वाशी पारेषण झोन अध्यक्ष,दिलीप पाटील वाशी पारेषण झोन सचिव,कॉम्रेड बाळकृष्ण महाले सचिव, संचालक कॉम्रेड महादेव गायकवाड,किरण तारमोळे,जीवन खरात,प्रकाश बोटे,सुरेश पवार,सौ. रेवती धादवड,शिवलिंग हुंडीवाले, व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक कॉम्रेड बाळकृष्ण महाले यांनी केले.उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते कॉम्रेड ए.बी.बर्धन कॉम्रेड,दत्ता देशमुख व विद्येची देवता सरस्वती देवीचे पूजन करू,दिपप्रज्वलित करत झाले. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर यांचे पुष्पगुच्छ,शाल, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.

पतसंस्थेचे सभासद असलेल्या कर्मचाऱ्यांच्या २९५ च्या वर पाल्यांना पहिली ते पदवीपर्यंत उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तके,पेण,वह्या व स्कूल व कॉलेज बॅगचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी मा.विजय डेंगळे MPSC/UPSC परीक्षा मार्गदर्शक यांचे विस्तृत मार्गदर्शन झाले. कॉम्रेड कृष्णा भोयर यांनी पतसंस्था व संघटनेची निर्मिती,विद्यार्थ्यांनी कसे घडले पाहिजे, प्रलंबित पगारवाढ करार याबाबत मार्गदर्शन केले.मा.सुरज चव्हाण जादूगर यांनी सुंदर जादूचे खेळ दाखवत मुलांचे मनोरंजन केले.या कार्यक्रमास मोठ्या

प्रमाणात विद्यार्थी व त्यांचे पाल्य उपस्थित होते. अल्पपोहारानंतर,राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Don`t copy text!