Home Breaking News शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या समस्या तातडीने सोडवा – शिक्षक आमदार अडबले

शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या समस्या तातडीने सोडवा – शिक्षक आमदार अडबले

113

शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या समस्या तातडीने सोडवा – शिक्षक आमदार अडबले

गडचिरोली, प्रतिनिधी :-

गडचिरोली जिल्ह्यातील खाजगी अनुदानित व विना अनुदानित शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या समस्या तातडीने सोडवा. असे आदेश शिक्षक आमदार अडबले यांनी सहविचार व आढावा बैठकीत शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग यांना दिले आहे.

दिनांक २१ जून २४ ला गडचिरोली येथे सहविचार सभे करिता नागपूर विभाग चे शिक्षक आमदार सुधाकराव अडबले आले होते. या वेळी त्यांना गडचिरोली जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर सेवक संघ च्या वतीने जिल्हा अध्यक्ष अशोक काचिनवार, जिल्हा कार्यवाह उदय धकाते यांनी कालबद्ध पदोन्नती व वरिष्ठ श्रेणी चे प्रस्ताव थेट मंजुरी करिता पाठवावे अशी मागणी निवेदन देऊन यावर चर्चा केली. सदर विषय त्यांनी आजच सहविचार सभेत ठेऊन या वर चर्चा करतो आपण महामंडळ चे पदाधिकारीयांनी सभेला उपस्थित राहावे असे सांगितले.

जिल्हा परिषद येथे झालेल्या सलग ९ तासाच्या सभेत संध्याकाळी कालबद्ध पदोन्नती च्या निवेदनावर चर्चा सुरु झाली. गडचिरोली जिल्ह्यातील वरिष्ठ व कालबद्ध पदोन्नती चे प्रस्ताव हे शिक्षणाधिकारी माध्यमिक कडे न पाठवता थेट लेखाधिकारी यांचे कडून वेतन निश्चिती करावी अशी सूचना  शिक्षकेत्तर चे जिल्हा कार्यवाह उदय धकाते यांनी केली कारण शिक्षकेत्तर कर्मचारी यांना कोणतेही प्रशिक्षण नसल्याने त्यांना जिल्हा परिषद शिक्षण विभाग कडून मंजुरी ची अट ठेऊ नये अशी मागणी केली. यावर मजुरी घ्यावी लागेल अशी भूमिका शिक्षणाधिकारी यांनी घेतली. परंतु शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्या कडे झालेल्या बैठकीत हा कालबद्ध पदोन्नती ची वेतन श्रेणी सर्व पदाची वेतन निश्चित टप्पे ठरवून तसे आदेश कार्यबळ च्या सभेत ठेऊन विभागात सर्वांचे वेतन निश्चित करण्यात येईल अशी माहिती आमदार अडबले यानी दिली. जिल्ह्यात वेतन निश्चितिचे शिबीर घेण्यात यावे अशी मागणी कार्यवाह उदय धकाते यांनी केली.

जिल्ह्यात अनेक खाजगी शाळेचे वार्षिक शाळा तपासणी २०१९ पासून झाली नाहीत. या मुळे मंडळ मान्यतेचे मुदत संपली असूनही मंडळ मान्यतेचे प्रस्ताव नागपूर बोर्ड कडे शेकडो शाळा सादर करू शकत नाही नाही आहे. या मुळे दहावी च्या विद्यार्थी यांचे नुकसान होउ शकते तसेच आरटीई प्रमाणपत्र अनेक शाळांना मिळाली नसल्याचे माहिती कार्यवाह उदय धकाते यांनी दिली. याची आमदार अडबले यांनी गंभीर पणे दखल घेऊन शिक्षण विभागाला ३१ आगस्ट पर्यंत सर्व शाळांचे वार्षिक तपासणी करून सर्व शाळांना अहवाल द्यावे. दयावे. जर कोणत्याही विद्यार्थी यांचे नुकसान झाले तर शिक्षणाधिकारी हे जबाबदार असतील असा सज्जड दम दिला.वेतनेत्तर अनुदान करिता प्रस्ताव लवकर मागवून शाळांना वेतनेत्तर तात्काळ देण्यात यावे असे निर्देश दिले. या शाळा कडून फक्त उपयोगिता प्रमाणपत्र घ्यावे असं आमदार अडबले यांनी निर्देश दिले आहे.

७ शाळांच्या मुख्याध्यापक पदाचे प्रस्ताव तातडीने ऑन द स्पॉट आताच द्यावे अन्यथा हे सभागृह सोडणार नाही असा इशारा आमदार अडबले यांनी दिल्याने वातावरण गरम झाले. अखेर मुख्य कार्यपालन अधिकारी आयुषी सिंह यांनी  आजच सर्व मुख्याध्यापक यांना मान्यता द्यावे असे शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना आदेश दिले.

रात्री १० वाजता पर्यंत आमदार अडबले हे ठाण मांडून बसले होते. अखेर सर्व मुख्याध्यापक यांना मान्यता प्रदान केले. यावेळी वसंत विद्यालय गडचिरोली चे मुख्याध्यापक सौ. सुचिता कामडी व  गोगाव चे मुख्याध्यापक बोमनवार, संजय गौरकर यांना मान्यता आदेश आमदार अडबले साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

यावेळी विमाशीचे कार्यवाह अजय लोंढे,शेमदेव चाफले,किशोर पाचभाई,शिक्षकेत्तर कार्यवाह उदय धकाते, जिल्हा अध्यक्ष अशोक काचिनवार आदी उपस्थित होते.

शिक्षकेत्तर कर्मचारी चे प्रश्न मांडल्याबद्दल आमदार अडबले साहेब यांचे यावेळी शिक्षकेत्तर संघटनेकडून आभार माणण्यात  आले.

*गडचिरोली जिल्ह्यात शिक्षकेत्तर यांच्या साठी लढणारी उदय धकाते यांच्या नेतृत्वात एकमेव संघटना असून याचे सर्वांनी सदस्य व्हावे असे आवाहन शिक्षकेत्तर महामंडळ चे राज्य सरकार्यवाह शिवाजीराव खांडेकर आणि राज्य अध्यक्ष अनिल माने, राज्य कार्याध्यक्ष मोरेश्वर वासेकर (चिमूर) यांनी केले आहे.*

Don`t copy text!