मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमातील पत्रकारांची नाव उलटली; सगळे सुखरूप
भडारा :- मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांचा भडारा दौरा असल्याने वार्तांकन करन्यासाठी आलेल्या पत्रकारांची बोट वैनगंगा नदीत वार्तांकन करीत असताना उलटल्याची धक्कादायक घटना आज दुपारच्या सुमारास घडली. यामुळे एकच धावपळ उडाली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज, सोमवारी भंडारा जिल्ह्याच्या दोऱ्यावर होते. या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री वैनगंगा नदीवरती होणाऱ्या जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्पाच्या पहिल्याचे टप्प्याचे भूमिपूजन करणार होते. यासाठी मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या दौऱ्याच्या वार्तांकनासाठी आलेले पत्रकार २ स्वतंत्र बोटीतून नदीपात्रात जाऊन आढावा घेत होते. यावेळी पत्रकार मुख्यमंत्र्यांचे व्हिडिओ व फोटो काढण्यासाठी बोटीच्या एका बाजूला आले आणि काही कळेनासे होण्याच्या आतच पत्रकारांची बोट नदीपात्रात कलटी झाली या अनपेक्षित घटनेमुळे सर्वचजण घाबरले
आणि एकच धावपळ सुरू झाली मात्र प्रसंगावधान तिथे असणाऱ्या इतर बोटी तात्काळ बचावकार्यासाठी पत्रकारांच्या बाजूला वळत्या करून बोटिद्वरे सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आस्थेने पत्रकारांवर्ती घडलेला प्रसंग पाहून आपल्या बोटीसह मदतकार्यासाठी पोहोचले आणि यंत्रणा कामाला लावली यामुळे कोणतीही जीवित
हानी झाली नाही मात्र काही कॅमेरामन यांचे कॅमेरे पाण्याच्या प्रवाहात आल्याने त्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे